Home विदर्भ अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हाकार्याध्यक्षपदी गोविंद अंबुसकर

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हाकार्याध्यक्षपदी गोविंद अंबुसकर

 

शेगांव[प्रतिनिधी]-
अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघाच्या जिल्हाकार्याध्यक्षपदी गोविंद रमेशराव अंबुसकर यांची नियुक्ती करण्यात आली.
तत्कालिन काळात शेगांव तालुकाध्यक्ष म्हणुन कार्यकाळ यशस्वी रित्या सांभाळुन संघटनात्मक बांधणी अधिक केली होती. त्या अनुषंगाने केंद्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे,केंद्रीय सचिव अशोकराव पवार यांचे मार्गदर्शनात अ.भा.ग्रा.पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलासबाप्पु देशमुख यांनी दि.26 नोव्हे. रोजी ही नियुक्ती जाहीर केली. विदर्भ अध्यक्ष संजय कदम व सचिव उमेश सिरसाट यांचे उपरोक्त नियुक्ती मध्ये महत्वाचे योगदान असुन भविष्यात संघटनात्मक बांधणी अधिक मजबुत करुन पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी काम करणार असल्याचे नवनियुक्त जिल्हाकार्याध्यक्ष गोविंद अंबुसकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. या नियुक्तीमुळे त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here