Home बुलडाणा जिल्हा वृत्त सन्मान कर्तुत्वाचा ! आदर्श शिक्षक ज्ञानेश्वर गावंडे यांना राष्ट्रीय शिक्षकरत्न पुरस्कार...

सन्मान कर्तुत्वाचा ! आदर्श शिक्षक ज्ञानेश्वर गावंडे यांना राष्ट्रीय शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान

 

शेगाव : येथील श्री ग. भि. मुरारका विद्यालयात कार्यरत असलेले शिक्षक ज्ञानेश्वर रूपचंद गावंडे यांना राष्ट्रीय शिक्षक रत्न नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला .येथील कृष्णा कॉटेज मध्ये हा समारंभ पार पडला.

महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद महाराष्ट्रच्या वतीने हा सन्मानाचा पुरस्कार विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बद्दल दरवर्षी दिला जात असतो. यावर्षी शेगाव येथील आदर्श शिक्षक म्हणून परिचित असलेले ज्ञानेश्वर गावंडे यांना राष्ट्रीय शिक्षकरत्न नागरी पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाला शेगाव येथील नगराध्यक्ष सौ शकुंतलाताई बुच, माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.