Home Breaking News तीन देशी पिस्टल व जीवंत काडतूससह एकास रंगेहाथ पकडले एएसपी श्रवण...

तीन देशी पिस्टल व जीवंत काडतूससह एकास रंगेहाथ पकडले एएसपी श्रवण दत्त यांच्या विशेष पथकाची कारवाई

 

खामगाव देशी पिस्टल व जिंवत काडतुसांची विक्री करण्यासाठी जिल्हयात आलेल्या एका जणाला अप्पर पोलीस अधीक्षक दत्त यांच्या विशेष पथकाने रंगेहात पकडले ही कारवाई २३ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास चिखली – खामगाव रोडवरील किन्ही महादेव फाट्याजवळ हिवरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली . मिळालेल्या माहिती नुसार याबाबत अप्पर पोलीस अधिक्षक श्रवण दत्त यांना परजिल्ह्यातून जिल्ह्यात पिस्टल व जिवंत काडतूस विक्रीसाठी एक इसम घेवून येत असल्याची माहिती मिळाली.या माहितीवरून एएसपी श्रवण दत्त यांनी २३ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास चिखली – खामगाव रोडवरील किन्ही महादेव सापडा रचला .या माहितीप्रमाणे लाल रंगाची बजाज डिस्कव्हर येतांना एएसपी पथकाला आढळून आली .यावेळी पोलिसांनी त्यास पकडून त्याची झाडाझडती घेतली असता त्यांच्या गाडीच्या डिक्कीत ३ देशी बनावटी पिस्टल , ४ जिवंत काडतूस किमती एकूण ४७ हजाराचा रुपये मिळून आले .यावेळी पोलिसांनी त्यास विचारणा केली असता त्याने उडवा उळवीचे उत्तर दिले यावेळी पोलिसांनी साबीर खान बिस्मिल्ला खान यास ताब्यात घेवून त्यांच्याजवळील मोटारसायकल , ३ देशी पिस्टल व ४ जिवंत काडतुसे असा एकूण ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक केली . याप्रकरणी पोना गजानन आहेर यांच्या तक्रारीवरून हिवरखेड पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला . सदर कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांच्या मार्गदर्शनाखाली व अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त ( खामगाव आदेशाने अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ सुर्यवंशी , पोहेकॉ गजानन बोरसे , पोना गजानन आहेर ,पोना रघुनाथ जाधव ,पोना संदिप टाकसाळ , पोना श्रीकृष्ण नारखेडे , पोका राम धामोडे यांनी केली .