Home Breaking News खामगाव बाजार समिती निवडणूक ; घोडेबाजार होवू नये म्हणून वंचितने घेतला असा...

खामगाव बाजार समिती निवडणूक ; घोडेबाजार होवू नये म्हणून वंचितने घेतला असा पवित्रा

 

जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे यांनी दिले जिल्हा उपनिबंधक याना निवेदन

 

खामगाव / प्रतिनिधी:

कृषि उत्पन्न बाजार समिती खामगांवच्या प्रारुप मतदार यादीवर वंचित बहूजन आघाडीने आक्षेप नोंदविला असून याबाबत बुधवारी जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलढाणा यांना एक निवेदन दिले आहे. सदर निवेदनात नमूद केले आहे की,कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या संदर्भातील प्रारूप मतदार यादी १५ नोव्हेंबर रोजी प्रकाशित झालेली आहे . या यादीवर वंचीत बहुजन आघाडी उत्तर बुलडाणा जिल्हा पुर्णपणे आक्षेप घेत आहे . बाजार समितीच्या सहकारी संस्था या भागातुन मतदार यादी प्रसिध्द करण्यात आलेली आहे . मतदारांची संख्या निवडणुकीस योग्य वाटत नाही . त्यामुळे या निवडणुकीमध्ये घोडेबाजार ऊफाळुन येईल व बाजार समिती शेतक – यांची राहणार नाही . शेतक – यांचे प्रतिनिधी त्या ठिकाण बसु शकणार नाहीत .

पत्रकार बनायचे… कॉल करा..!

प्रारूप यादीतील मतदार संख्या या पूर्वी पार पडलेल्या बाजार समितील सहकारी संस्था मतदार संघाच्या मतदार संख्येशी कोठेही जुळत नाही . तसेच ग्रामसेवा सोसायटीमध्ये एकुण ११ संचालक निवडुण येतात व ग्रामपंचायत चार , व्यापारी दोन , हमाल मापरी एक असे एकुण १८ संचालक कृषि उत्पन्न बाजार समिती खामगांव येथे निवडुण येतात . परंतु कृषि उत्पन्न बाजार समिती ही शेतक – यांची असल्यामुळे त्या ठिकाणी ११ सदस्य हे सोसायटीचेच आहेत .आज रोजी खामगांव कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये खामगांव सहकारी संस्थाचे एकुण ५५ सोसायटी आहेत . त्यापैकी सहा सोसायटी हया पुर्नजिवीत आहेत व ४९ सोसायटी हया बरखास्त झालेल्या आहेत . ज्या सहा पुर्नजिवीत आहेत त्या पैकी पाच चा कार्यकाळ संपलेला आहे . त्यांना कोणत्याही प्रकारे अधिकार नाहीत . त्यामध्ये प्रचंड तफावत आहे बाजार समिती अतंर्गत येणा – या अनेक सहकारी संस्थेच्या निवडणुका होणे बाकी आहेत . तत्पूर्वी काही संस्थांनी प्रतिनिधींची नेमणुक केलेली आहे , तीच नावे प्रारूप यादीत आहेत . सहकारी संस्था निवडणुकी दरम्यान अनेक संस्थांनी ऑडीट न करता प्रतिनीधींची नेमणुक करुन शेतक – यांना वंचीत ठेवण्याचा घाट केलेला आहे . प्रारूप मतदार यादी ही नियमाला धरुन नसल्याने ही यादी रद्द करण्यात यावी व खामगांव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या एकुण ५५ सोसायटीची निवडणुक करुनच पुढील मतदार यादी प्रारूप करावी . शेतकरी , कष्टकरी आणी व्यापारी यांचेवर अन्याय होऊ नये म्हणून वंचीत बहुजन आघाडी उत्तर बुलडाणाच्या वतीने जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे यांनी जिल्हांचे वतीने आक्षेप नोंदविला आहे.