Home Breaking News चिखली शहरात सशस्त्र दरोडा टाकून इलेक्ट्रॉनिक दुकान मालकाचा केला खून

चिखली शहरात सशस्त्र दरोडा टाकून इलेक्ट्रॉनिक दुकान मालकाचा केला खून

 

बुलडाणा : जिल्ह्यातील चिखली शहराच्या जयस्तंभ चौकातील आनंद इलेक्ट्रॉनिक या दुकानात आज 16 नोव्हेंबर च्या रात्री 9:45 वाजेच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला असून दोन दरोडेखोरांच्या हल्ल्यात दुकान मालक कमलेश पोपट वय 55 वर्ष यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण चिखली शहरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी पोलीस दाखल झाली आहे.

आनंद इलेक्ट्रॉनिक्सचे मालक कमलेश पोपट आज मंगलवारी रात्री पौनेदहा वाजेच्या सुमारास त्यांनी आपली दुकानाचा मुख्य शटर बंद केला व बाजूचा लहान शटर उघडा असताना एका दुचाकीवर तीन दरोडेखोर आले त्यातील दोन जण ग्राहक बनून दुकानात घुसले व त्यांनी कमलेश पोपट यांच्यावर धारदार शस्राने हल्ला करुण रोख रक्कम लुटून फरार झाले. जखमी अवस्थेत कमलेश पोपटी यांना चिखलीतील एका खासगी रुग्णालयात देण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे.

मागील काही दिवसात बुलडाणा जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनेमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. घाटावरचा प्रभार खामगावचे एडिशनल एसपी श्रावण दत्त यांच्याकडे असताना मागील दहा दिवसापासून घाटा खाली प्रमाणे घाटावर सुद्धा अवैध व्यवसायिकांनी आपली दुकाने गुंडाळून ठेवली होती परंतु काल 15 नोव्हेंबर पासून सर्व अवैध धंदे पूर्वपदावर आल्याचे चित्र दिसत आहे. कायदा व सुव्यवस्था याकडे सुद्धा पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे.