Home Breaking News पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या घोषणे नुसार भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करणार– किरीट सोमय्या

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या घोषणे नुसार भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करणार– किरीट सोमय्या

 

खामगाव : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी स्वच्छ व भ्रष्टाचार मुक्त भारत करण्याचा संकल्प घेतला आहे. त्याचेच आशिर्वादाने महाराष्ट्रातील भ्रष्टाचाऱ्यांना उघडे करण्याचे काम मी हाती घेतले आहे. मागील काळात या राज्याचे गृहमंत्री जेल मध्ये गेले, या पोलीस कमीशनर फरार, पोलीस इन्स्पेक्टर जो खुनी होता त्याला उध्दव ठाकरेनी नोकरीत घेतले, तो पुन्हा नोकरीवर आला आणि त्यानी खुन केला. हे सरकार भ्रष्टाचारात बरबटलेले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचार मुक्त भारतच्या घोषणेप्रमाणेच भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र आम्ही करणार आहे ,असे किरीट सोमय्या खामगांव येथे आले असता कार्यकर्त्यांना संबोधतांना म्हणाले.
भाजपाचे माजी खासदार किरीटजी सोमय्या हे आज बुलढाणा दौऱ्यावर आहेत. यासाठी ते खामगांव येथून जातांना भाजपा कार्यालयावर भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी त्यांना पुष्पहार घालून स्वागत केले. खामगांव येथील स्वागताच्या वेळी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधतांना ते म्हणाले की, मला अभिभान आहे मी भाजपा कार्यकर्ता आहे. मी करीत असलेल्या कामाबददल भाजपाचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे. प्रत्येक ठिकाणी मी जिथही जात आहे तिथे भाजपा कार्यकर्ते माझ भरभरुन स्वागत करीत आहेत व माझ्या पाठीशी ठाम उभे असल्याचे दर्शवत आहेत.
या राज्यात ठाकरे पवार यांची सरकार आल्यापासून रोज नवे नवे घोटाळे समोर येऊन राहीले असून या राज्याचा माजी गृह मंत्री जेल मध्ये आहे, पोलीस कमीशनर फरार आहे, पोलीस इन्स्पेक्टर जो खुनी होता त्याला उध्दव ठाकरेनी नोकरीत घेतले, तो पुन्हा नोकरीवर आला आणि त्याने खून केला तो जेल मध्ये आहे. उध्दव ठाकरेंची पोलीसचे पोलीसच सुपारी घेतात. हे सर्व भ्रष्टाचारी जेल मध्ये जाणार आहेत. शिवसेना प्रवक्ता संजय राऊत यांना 55 लाख त्यांना परत करावे लागले, उध्दव ठाकरेचा सेक्रेटरी मिलींद नार्वेकर यांनी स्वत:च बंगला तोडला. काल महाराष्ट्रात ईडीच्या 7 ठिकाणी धाडी पडल्या हे सर्व भ्रष्टाचारी आहेत. यांना कोणत्याच परिस्थितीत सोडणार नाही. एकाला पण सोडणार नाही असे ही ते यावेळी म्हणाले.
यावेळी भाजपा चे जि.प.सदस्य, पं.स.सदस्य्, न.प.सदस्य, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी यावेळी किरीट भाई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, किरीट भाई तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है च्या घोषणा दिल्या.

पहा व्हिडिओ