Home क्रीडा पाकिस्तान संघाचा उपांत्य फेरीत पराभव; असा रंगला सामना:आता ऑस्ट्रेलियाचा सामना रविवारी ...

पाकिस्तान संघाचा उपांत्य फेरीत पराभव; असा रंगला सामना:आता ऑस्ट्रेलियाचा सामना रविवारी न्यूझीलंडशी !

टी २० वर्ल्डकप स्पर्धेचा प्रमुख दावेदार असेलला पाकिस्तान संघाचा उपांत्य फेरीत पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत पाकिस्ताननं दिलेल्या १७७ धावा १९ षटकातच पूर्ण केल्या. या विजयासह ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत पोहोचला आहे. आता अंतिम फेरीत पाकिस्तानचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. पाकिस्तानचं दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. पाकिस्तान भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांनीही जल्लोष केल्याचं काही ठिकाणी पाहायला मिळालं.

यंदाच्या विश्वचषकात (T20 World Cup 2021) कमालीच्या फॉर्ममध्ये असलेल्या पाकिस्तानने ऑस्ट्रेलियासमोर मात्र शेपूट घातली आहे. सेमीफायनलच्या सामन्यात 5 विकेट्सनी पराभूत होत पाकिस्तान स्पर्धेबाहेर गेला आहे. तर ऑस्ट्रेलियाने थेट अंतिम सामन्यात एन्ट्री मिळवली आहे. आता ऑस्ट्रेलियाचा सामना रविवारी (14 नोव्हेंबर) न्यूझीलंडशी होणार आहे.

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना तसा कमालीचा चुरशीचा झाला. एखाद्या रोलर कोस्टर राइडप्रमाणे कधी पाकच्या तर कधी ऑस्ट्रेलियाच्या दिशेने झुकणाऱ्या सामन्यात अखेर ऑस्ट्रेलियानेच सरशी केली आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने 176 धावांपर्यंत मजल मारली होती. जे टार्गेट ऑस्ट्रेलियाने 5 गडी आणि एक ओव्हर राखून पूर्ण केलं आहे. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीतील फलंदाज मार्कस स्टॉयनिस आणि मॅथ्यू वेड हे विजयाचे शिल्पकार ठरले आहेत.

177 धावांचे खमके आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात आलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात अतिशय खराब झाली. कर्णधार शून्यावर बाद झाला. ज्यानंतर वॉर्नर आणि मार्शने सामना सांभाळण्याचा प्रय्तन केला पण मार्श 28 धावा करुन तंबूत परतला. ज्यानंतर स्मिथ, मॅक्सेव 5,7 धावा करुन बाद झाले. त्याच काही ओव्हर्समध्ये सामना सांभाळणारा वॉर्नरी 49 धावा करुन बाद झाला. निम्मा संघ तंबूत परतल्यानंतर मात्र क्रिजवर आलेल्या मार्कस स्टॉयनिस आणि मॅथ्यू वेड यांनी तुफान फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाला 5 गडी आणि एक ओव्हर राखून विजय मिळवून दिला. शाहीन आफ्रिदीच्या 19 व्या षटकात वेडने लागोपाठ 3 सिक्स मारुन सामना जिंकवला. यावेळी मार्कसने नाबाद 40 आणि मॅथ्यूने नाबाद 41 धावांची खेळी केली.

झेल सुटला ही चूक महागात

19 व्या षटकात मॅथ्यूच्या तुफान सिक्सेसमुळे सामना पाकला गमवावा लागला. पण याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर पाकिस्तानच्या हसन अलीने मॅथ्यूचा एक झेल देखील सोडला. जो सामन्यात टर्निंग पॉईंट ठरला. कारण ती कॅच घेतली असती तर पुढील षटकार मॅथ्यू मारु शकला नसता आणि पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला नसता.