Home जागर राष्ट्र प्रथम समूहातर्फे दिवाळीनिमित्त माजी सैनिक पोलीस बांधवांना फराळाचे वाटप

राष्ट्र प्रथम समूहातर्फे दिवाळीनिमित्त माजी सैनिक पोलीस बांधवांना फराळाचे वाटप

एक दिवा सैनिकांसाठी उपक्रम
संग्रामपूर : तालुक्यामधील रुधाना, वकाना, पातुरडा खुर्द, पातुरडा बु,टुनकी, बावनबीर, सोनाळ,सगोड़ा, चांगेफळ, व तसेच शेगाव शहर पोलिस स्टेशन येथे एक दिवा पोलिस बांधवांसाठी या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली वरील सर्व गावांमधील माजी सैनिक पोलीस बांधव पत्रकार यांना दिवाळीनिमित्त फराळाचे वाटप करण्यात आले
तरुणाचे मार्गदर्शक अविनाश तायडे हे यांच्या आगळ्या वेगळ्या देशभक्तीच्या उपक्रमांमधून आपल्या परिसरासहित महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत दरवर्षी दिवाळी निमित्य सैनिक व पोलिस बांधवांच्या घरी जाऊन ते त्या परिवारांचा सन्मान करतात व दिवाळी निमित्य मिठाई वाटप करतात त्यांच्या या उपक्रमाचे हे चौथे वर्ष आहे गेल्या चार वर्षापासून राष्ट्रप्रथम समुह या त्यांनी स्थापन केलेल्या संघटनेच्या माध्यमातून पोलिस व सैनिक बांधव यांच्या घरी जाऊन सन्मान करणे ही अखंड सेवा त्यांच्या कडून सुरु आहे या वर्षी हा उपक्रम 11 ते 12 गावांमधे साजरा करण्यात आला व अजुन ही या उपक्रमाचे कार्य सुरुच आहे.

पत्रकार बनायचे… कॉल करा..!

आपल्या देशाचे खरे हीरो हे सैनिक आणि पोलिस बांधव च आहेत मात्र दिवाळी सारख्या सन उत्सवाच्या दरम्यान ही त्यांना सहभागी न व्हता ते देशाची अविरत सेवा करत असतात त्यामुळे त्यांच्या सहित त्यांच्या परिवाराचा सन्मान करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे ही भावना सर्व तरुण वर्गामध्येरुजावी व सर्व तरुणानी सैनिक व पोलिस बांधवांचा आदर्श घ्यावा म्हणून हा उपक्रम घेण्याचा त्यांचा उद्देश्य आहे या उपक्रमांमध्ये निखिल जाधव, प्रशांत गायकवाड ,सागर वावरे, संजय बावस्कर इत्यादी कार्यकत्यानी सहभाग झाले होते