Home Breaking News एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढा अन्यथा उद्रेक होईल – विठ्ठल लोखंडकार

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढा अन्यथा उद्रेक होईल – विठ्ठल लोखंडकार

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला मनसेचा जाहीर पाठींबा
खामगाव – राज्य परिवहन महामंडळाचा राज्य शासनामध्ये सहभाग करून एसटी कामगारांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व भत्ते लागू करावे यासह विविध मागण्यांसाठी गेल्या ४ दिवसांपासून एसटी कामागर बेमूदत संपावर गेले आहेत. खामगाव येथेही एसटी कर्मचारी संपात सहभागी असून ८ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष विठ्ठलभाऊ लोखंडकार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी एसटी आगार येथे एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेवुन त्यांचेशी चर्चा केली व त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या. यावेळी मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या आदेशान्वये एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला मनसेच्या वतीने जाहीर पाठींबा लोखंडकार यांनी जाहीर केला.

पत्रकार बनायचे… कॉल करा..!

दरम्यान विठ्ठल लोखंडकार म्हणाले की, एसटी कामागरांच्या मागण्या ह्या रास्त असून सरकारने याकडे लक्ष देवून तात्काळ तोडगा काढावा व कामागारांच्या मागण्या मंजूर कराव्यात. तसेच आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्ती अथवा अन्य कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये. अन्यथा, कर्मचारी, कामगारांमधील असंतोषाचा उद्रेक होईल असा इशाराही यावेळी त्यांनी दिला. यावेळी त्याच्यासोबत वाहतुक सेना जिल्हाध्यक्ष शिवा लगर, शहर अध्यक्ष आनंद गायगोळ, शहर उपाध्यक्ष आकाश पाटील, शहर उपाध्यक्ष अभिजित महानकर, प्रतिक लोखंडकार, सागर बावस्कर यांच्यासह महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे पदाधिकारी व एसटी कामगार उपस्थित होते.