महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव दादर रेल्वे स्टेशनला द्या !
मलकापूर :उल्हास शेगोकार
भारतीय संविधान ७० वर्षे लागू होऊन झाली तरी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दादर रेल्वे स्टेशनला का देण्यात आले नाही. सहा डिसेंबर आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दादर रेल्वे स्टेशनला मिळाले नाही तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर रेल रोको करू असे आवाहन भाई जगन सोनवणे सविधान आर्मी संस्थापक अध्यक्ष यांनी मलकापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केले.

ते पुढे म्हणाले की जीगाव प्रकल्पास भीम सागर असे नाव देण्यात यावे तसेच सर्वांनी संविधानाच्या प्रति आदर ठेवावा संविधानाचा कोणी अपमान केल्यास सविधान आर्मी त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. यावेळी हरीशभाई सुरवाडे, राकेश बगन, चंदू पैलवान ,बुलढाणा जिल्हा अध्यक्ष धनराज गोळे, गोलू तायडे मलकापुर तालुका अध्यक्ष, प्रशांत हिवराळे, मुकेश वाकोडे ,अतुल तायडे,यासह सविधान आर्मी च्या विविध आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.