Home Breaking News दलित वस्ती विकासापासून कोसो दूर!

दलित वस्ती विकासापासून कोसो दूर!

सहदेव वाकोडे

लाखनवाड़ा : येथील दलित वस्ती मध्ये मूलभूत सोयी सुविधांचा अभाव आहे सांडपाणी वाहून नेण्यासाठी नाल्या नाहीत त्यामुळे रस्त्यावरच पाणी साचून नागरिकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे .

पत्रकार बनायचे… कॉल करा..!

लाखनवाडा दलित वस्तीमध्ये सांडपाण्याची घाणीचे साम्राज्य झाल्यामुळे आरोग्यास धोका होऊ शकतो या घाण पाण्याची विल्हेवाट लावण्यात यावी अशी मागणी लाखनवाडा येथील वार्ड क्रमांक एक मधील वैभव वाकोडे यांनी एका निवेदनाद्वारे ग्रामपंचायत कडे मागणी केली लाखनवाडा येथील राऊतवाडी वार्ड क्रमांक एक मध्ये दलित वस्ती मध्ये घाणीचे साम्राज्य झाल्यामुळे आरोग्यास धोकादायक आहे या घाणीमुळे मलेरिया टायपिंग डेंगू सारखे आजार झपाट्याने पसरत असून या गाण्याची त्वरित विल्हेवाट लावून रस्ता दुरुस्त करण्यात यावी व घाण पाणी विल्हेवाट करण्यात यावी अशी मागणी केली आहे याबाबत बऱ्याचदा ग्रामपंचायत ग्राम विकास अधिकारी यांच्याकडे अनेकदा निवेदन देऊन सुद्धा दखल घेतली नसल्यामुळे या भागातील लोकांना अनेक रोगांना सामोरे जावे लागत आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित या बाबीकडे लक्ष देऊन समय समस्येची विल्हेवाट लावावी अशी मागणी होत आहे.