Home Breaking News भारतीय जनता पार्टी एस.टी.कामगारांच्या पाठीशी ; सरकारने आठमुठे धोरण सोडावे  – आ.ॲड.आकाश...

भारतीय जनता पार्टी एस.टी.कामगारांच्या पाठीशी ; सरकारने आठमुठे धोरण सोडावे  – आ.ॲड.आकाश फुंडकर

खामगांव आगारात सुरु असलेल्या एस.टी.कामगांरांच्या आंदोलन स्थळी आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी दिली भेट.

एस.टी.कामगारांच्या अनेक कुटूंबाची दयनीय अवस्था.

संपुर्ण राज्यास सद्या एस.टी.कामगार हे दि.06 नोव्हेंबर पासून संपावर गेले आहेत. एस.टी. हा राज्यातील सर्वसामान्य प्रवाश्याना दळणवळणास सर्वात चांगला पर्याय आहे.  एस.टी.चे जाळे संपुर्ण राज्यात पसरले आहे.  या एस.टी. कामगारांना मात्र राज्य सरकार कडून भेदभावर्पुण वागणुक मिळत आहे.  त्यामुळे त्यांच्य हक्काच्या मागण्यासाठी हे एस.टी. कामगार संपावर गेले आहे.  आज त्यांच्या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर हे आंदोलन स्थळी गेले यावेळी ते म्हणाले भारतीय जनता पार्टी एस.टी. कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.

कोरोना महामारीच्या काळात राज्य परिवहन मंडळाने ट्रान्सपोर्ट सुविधा सुरु केली होती त्यासाठी अनेक कामगार कोरोना महामारीच्या काळात देखील कामावर रुजू झालेले होते.  त्यांनी या संकट काळात ट्रान्सपोर्ट सेवा सुरु केली.  त्यासाठी एस.टी. कामगार ठामपणे महामंडळाच्या सोबत उभे राहीले व त्यांनी या महामारीच्या काळात देखील सुविधा दिली.  यात काळात अनेक एस.टी.कामगार मृत्युमुखी पडले होते.  आज त्यांचे कुटूंबीय उघडयावर आले.  त्यांना अनेक कौटूंबिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यांच्या कुटूंबीयांना रु 50 लक्ष मदत देण्याची मागणी केली आहे.  परंतु अद्याप पर्यंत या कोरोना योध्दयांना मदत देण्यात आली नाही.

राज्य परिवहन मंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करुन राज्य कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन व भत्ते लागू करण्याबाबतची मागणी देखील प्रलंबीत आहे.  यासाठी देखील एस.टी.कामगारांनी अनेक वेळा निवेदने देऊन पाठपुरावा केला परंतु त्यावर देखील कोणताच निर्णय घेतल्या जात नाही.  आर्थीक अडचणीत सापडलेल्या अनेक एस.टी.कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या कुटूंबीयांना देखील तातडीने मदत होणे गरजेचे आहे.

पत्रकार बनायचे… कॉल करा..!

या तीन प्रमुख मागण्या ज्या मान्य करणे सर्वस्वी राज्य सरकारच्या हातात आहे.  त्या मंजूर करुन तात्काळ हा संप मिळविता येतो.  परंतु राज्य सरकारचे नेहमी प्रमाणे ‍ मिळमिळीत धोरण राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यास भाग पाडत आहे.  त्याचा राज्य  भरातील प्रवाश्यांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे.  त्यामुळे राज्य सरकारने आडमुठे धोरण न बाळगता एस.टी. कामगारांच्या कुटूंबीयांचा सहानुभूतीपुर्वक विचार करुन त्यांच्या मागण्या तात्काळ मंजूर करुन हा संप मिटवावा असेही आमदार ॲड आकाश फुंडकर यावेळी म्हणाले.