Home Breaking News बी एस पटेल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचे केले गुणांकन

बी एस पटेल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचे केले गुणांकन

पिंपळगाव काळे :स्थानिक बापूमिया सिराजोद्दीन पटेल कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पिंपळगाव काळे येथील विद्यार्थ्यांनी दिनांक सात ते नऊ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचे तीन दिवस गुणांकन केले. महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा डॉ बाबाराव सांगळे यांच्या नेतृत्वाखाली सत्तावीस विद्यार्थ्यांच्या चिमूला आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्री चंद्रकांत ईलग व राष्ट्रीय खेळाडू शिवांश दळवी यांनी दोन दिवस आधुनिक अर्चनी स्कोररचे प्रशिक्षण दिले व स्पर्धेदरम्यान उत्तम रित्या विद्यार्थ्यांनी स्कोरिंग चे काम करून तेथील स्पर्धा अधिकाऱ्यांना एक चांगला निकाल दिला.

पत्रकार बनायचे… कॉल करा..!

यामध्ये संकेत गई, पवन बोदडे, भूषण धुंदळे, दीपक कळसकर, ऋषिकेश काकडे, विशाल पवार, ओम देवचे, नितीन अवचार, आर्यन बांगर, विजय शिंदे, रोहन सातपुते, दीपक राऊत, रितेश सावंत, राजा सोळंके, विरेन सांगळे, अभिजीत मानकर, वैभव माटे, जाफरखान, राजेश शिंदे, सुशांत गवई, आकाश गई, जयश्री खोसे, अंकिता मुळे, उमेश मानकर होते
या होतकरू स्कोरर चे कौतुक महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष ॲड सलीम पटेल संस्थेचे संचालक प्रा कयूम पटेल, सिराजोद्दीन पटेल सहसचिव रब्बानी देशमुख प्राचार्य डॉ आई ए राजा आर्चरी अकॅडमीचे अध्यक्ष ॲड सुधाकर दळवी, समाधान जवकार व जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले.