Home Breaking News एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पुर्ण करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार – गजानन लोखंडकार

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पुर्ण करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार – गजानन लोखंडकार

प्रहार जनशक्ती पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली एसटी कर्मचाऱ्यांची भेट
खामगाव – राज्य परिवहन महामंडळचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करुन एसटी कामगारांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व भत्ते लागू करावे यासह इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला असून खामगांव आगारातील एसटी कर्मचारी सुध्दा संपावर गेले आहेत. दरम्यान ९ नोव्हेंबर रोजी प्रहार जनशक्ती पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रहारचे नेते गजानन लोखंडकार यांच्या नेतृत्वात एसटी आगार येथे एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेवुन त्यांचेशी चर्चा केली व त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या. यावेळी एसटी कामगारांच्या रास्त मागण्यांचा प्रहार जनशक्ती पार्टीचे सर्वेसर्वा नामदार बच्चूभाऊ कडू यांच्यामाध्यमातून शासन दरबारी पाठपुरावा करुन त्या मागण्या मंजूर करण्यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करु अशी ग्वाही यावेळी गजानन लोखंडकार यांनी दिली. यावेळी प्रहारचे गजानन लोखंडकार, शहर प्रमुख अक्षय हातेकर, शुभम मोरे, अमर देशमुख, पंकज बावणे यांच्यासह महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष अनिल तोडकर, सचिव गजानन सोनोने,महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेस इंटक संघटनेचे अध्यक्ष रामेश्वर ठाकरे,सचिव शेख इमरान, महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष इकबाल खान,सचिव गोपाल तायडे, शिवाजी आनंदे सह खामगांव आगारातील अनेक पदाधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.