Home Breaking News Acb ची कारवाई ; मेहकर नगराध्यक्ष कासम गवळी व त्यांच्या पत्नीवर गुन्हा...

Acb ची कारवाई ; मेहकर नगराध्यक्ष कासम गवळी व त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल

बुलडाणा :लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मेहकर नगराध्यक्ष कासम गवळी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
बुलडाणा येथील संजय चौधरी, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलढाणा यांच्या फिर्यादीवरून ही कार्यवाही करण्यात आली. त्यात कासम पिरु गवळी ,
वय- ५८ वर्षे , पद- नगराध्यक्ष, नगरपरिषद- मेहकर जिल्हा- बुलढाणा, सौ हसीनाबी कासम गवळी , वय- ३८ वर्षे,रा. – गवळीपुरा, मेहकर. ता-् मेहकर, जि. बुलढाणायांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
५ कोटी ९ लक्ष,८८ हजार ४९५ रुपये असंपदा आढळून आल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे.यातील लोकसेवक श्री कासम पिरु गवळी, नगराध्यक्ष, मेहकर यांनी नमूद परीक्षण कालावधीदरम्यान नगरपरिषद,मेहकर येथे लोकसेवक पदावर कार्यरत असताना, त्यांच्या ज्ञात व कायदेशीर उत्पन्नापेक्षा विसंगत अशी नमूद रकमेची अपसंपदा स्वतःच्या तसेच पत्नीच्या नावे बाळगल्याबाबत ते समाधानकारक खुलासा सादर करू शकले नाहीत; त्याचप्रमाणे श्री कासम गवळी यांच्या गैरकृत्यास त्यांची पत्नी सौ. हसीनाबी गवळी यांनी रुपये 98,45,517/- एवढी मालमत्ता ही अपसंपदा आहे हे माहित असून देखील ती जाणीवपूर्वक स्वतःच्या नावे धारण करून ती कब्जात बाळगण्याकामी लोकसेवक श्री कासम गवळी यांना सहाय्य केले आहे. म्हणून पो. स्टे. मेहकर येथे श्री कासम गवळी यांचे विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 13 (1) (ई) सहकलम 13 (2), ( भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 कलम 13 (1) (ब ) सहकलम 13 (2) दुरुस्ती दिनांक 26/07/2018 पासून )* व त्यांची पत्नी सौ. हसिना कासम गवळी यांचे विरुद्ध भा.द.वि. कलम 109 (भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 कलम 12 दुरुस्ती दिनांक 26/07/2018 पासून) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.