Home जागर देशोन्नती’चे राजेंद्र काळे यांना मराठी पत्रकार परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार

देशोन्नती’चे राजेंद्र काळे यांना मराठी पत्रकार परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार

▪️मराठी पत्रकार परिषदेच्या विविध पुरस्कारांची घोषणा
▪️२७ व २८ डिसेंबरला मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनात होणार वितरण

बुलडाणा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दिल्या जाणाNया पुरस्काराची घोषणा परिषदेचे विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी एका पत्रकान्वये केली असून, विदर्भातून एकमेव ‘देशोन्नती’चे बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र काळे यांना भगवंतराव इंगळे स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जीवन गौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार तथा ‘मार्मिक’ चे माजी संपादक पंढरीनाथ सावंत यांना देण्यात येणार असून, २५ हजार रुपये रोख, मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप राहणार आहे. उरूळी कांचन येथे परिषदेच्या अधिवेशनात पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

पत्रकार बनायचे… कॉल करा..!

मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दरवर्षी राज्यातील पत्रकारांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. त्यात दर्पणकारांच्या नावाने दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार यापुर्वी मा.गो.वैद्य, दिनू रणदिवे तसेच अन्य ज्येष्ठ पत्रकारांना देण्यात आला होता. यावर्षी पंढरीनाथ सावंत यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

परिषदेचे अन्य पुरस्कारही आज जाहीर करण्यात आले आहेत. आचार्य अत्रे यांच्या नावाने विद्यमान संपादकाला दिला जाणारा पुरस्कार ‘झी-२४ तास’ चे संपादक निलेश खरे यांना, सावित्रीबाई फुले यांच्या नावाने महिला पत्रकारास दिला जाणारा पुरस्कार मृणालिनी नानिवडेकर यांना, उद्योगपती रावसाहेब गोगटे यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार पालघर येथील पत्रकार अच्युत पाटील यांना, नागोरावजी दुधगावकर स्मृती पुरस्कार वसमत येथील संपादक उत्तमराव दगडू यांना, दत्ताजीराव तटकरे स्मृती पुरस्कार ‘कृषीवल’चे वृत्तसंपादक भारत रांजनकर यांना, पत्रकार प्रमोद भागवत स्मृती पुरस्कार सातारा येथील दीपक प्रभावळकर यांना व पत्रकार शशिकांत सांडभोर स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार दीपक कैतके यांना जाहिर करण्यात आला आहे. अकोल्याचे पत्रकार भगवंतराव इंगळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा पुरस्कार ‘देशोन्नती’चे बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र काळे यांना जाहीर करण्यात आला आहे.
मराठी पत्रकार परिषदेचे द्वैवार्षिक अधिवेशन २७ आणि २८ डिसेंबर रोजी पुण्याजवळ उरूळी कांचन येथे होत आहे. या अधिवेशनात मान्यवरांच्या हस्ते वरील सर्व पत्रकारांना सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी कोषाध्यक्ष विजय जोशी, सोशल मिडिया परिषदेचे राज्य प्रमुख बापुसाहेब गोरे, राज्य महिला आघाडीच्या संघटक जान्हवी पाटील, राज्य प्रसिद्धी प्रमुख अनिल महाजन व अमरावती विभागीय प्रसिद्धी प्रमुख अमर राऊत यांनी एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here