Home कृषि वार्ता वगळलेल्या गावांचा अतिवृष्टीग्रस्त यादीत समावेश करावा : संगीतराव भोंगळ पाटील

वगळलेल्या गावांचा अतिवृष्टीग्रस्त यादीत समावेश करावा : संगीतराव भोंगळ पाटील

संग्रामपूर :अतिवृष्टी झालेल्या यादीतून जी गावे वगळली गेली ती गावे पुन्हा समाविष्ट करावीत, तसेच त्या यादीत टाकळी आस्वंद, पातुर्डा खुर्द, पातुर्डा बु या गावांचा समावेश करावा अशी मागणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ उर्फ राजू पाटील यांनी केली. बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्रजी शिंगणे साहेब यांची भेट घेवुन त्यांनी या मागणीसाठी पाठपुरावा केला.

पत्रकार बनायचे… कॉल करा..!

व मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व सततच्या पावसामुळे या गावात कपाशी सोयाबीन व अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले. तरी सुद्धा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या गावांची नावे अतिवृष्टी झालेल्या यादीत समाविष्ट न केल्यामुळे शेतकरी वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी संगीतराव भोंगळ, शेतकरी वर्गातील साहेबराव सुलताने,भास्करराव मेहेंगे,सारंगधर काळे,अरुण दामोदर, वासुदेव मेहेंगे,देविदास सुलताने, देविदास भोंगरे, दिनकर मेहेंगे,धम्मपाल दामोदर,सोपान मेहेंगे,सुधाकर मेहेंगे,दीपक दामोदर,अजय मेहेंगे,ज्ञानेश्वर झाडोकार यांनी भेट घेऊन पालकमंत्री महोदयांना निवेदनाद्वारे मागणी केली तरी संबंधित विषयावर लवकरात लवकर न्याय देण्यात येईल असे आश्वासन पालकमंत्री डॉ.राजेंद्रजी शिंगणे यांनी दिले.