Home शेगाव विशेष भाऊबीज :मंत्री यशोमती ताईनं केले ‘नाना’ चे औक्षण!

भाऊबीज :मंत्री यशोमती ताईनं केले ‘नाना’ चे औक्षण!

 

श्रीधर ढगे पाटील

शेगाव : काँग्रेसचे नेते ज्ञानेश्वरदादा पाटील यांचे  निवासस्थानी महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या कॅबिनेट मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ताई ठाकूर यांनी शेगावात भाऊबीज साजरी केली. श्री संत गजानन महाराज यांची कृपादृष्टी असलेल्या गणेश घराण्यातील ज्ञानेश्वरदादा पाटील यांचे ताई यांनी औक्षण केलं. बहीण – भावाच्या पवित्र नात्याची ही भाऊबीज अत्यंत भावनिक वातावरणात पार पडली.

पत्रकार बनायचे… कॉल करा..!

यशोमती ताई ठाकूर ह्या एका कार्यक्रमानिमित्त शेगावात आल्या होत्या दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यशोमती ताई यांनी ज्ञानेश्वर दादा पाटील यांच्या पर्णकुटी बंगल्यावर सदिच्छा भेट दिली सध्या दिवाळी पर्व सुरू असून भाऊबीजेचा सण यशोमती ताई ठाकूर यांनी ज्ञानेश्वर दादा पाटील यांच्या पर्णकुटी बंगल्यावर साजरा केला त्यांनी ज्ञानेश्वर दादा उर्फ नाना यांना बंधू मानलेले असून भाऊबीज निमित्त त्यांनी नानांचे औक्षण केले यावेळी अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरण पाहायला मिळाले.

नाना एक भला माणूस

ज्ञानेश्वर दादा पाटील यांना आपण कधी भेटला आहात का? भेटला नसाल तर एकदा भेटून पहा सर्वांना आदर आणि प्रेम देणारा हा भला माणूस आहे. आपल्या पेक्षा वयाने लहान असलेल्या माणसालाही नाना प्रेमाने आदर देतात. नाना म्हणजे एक आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांना भेटलं ती त्यांच्या सेवा कार्याची प्रचीती येते.