Home जागर प्रहार जनशक्ती पार्टीने केली गरिबांची दिवाळी गोड!

प्रहार जनशक्ती पार्टीने केली गरिबांची दिवाळी गोड!

गोरगरीब व गरजुंना मदत करून केली दिवाळी साजरी

प्रहार जनशक्ती पार्टी चे गजानन लोखंडकार व योगीराज घुले यांचा पुढाकार

खामगाव – सर्वत्र दिवाळीची लगबग असून समाजातील निराधार, गरीब कुटूंब मात्र आनंदापासून दूर राहतात. या गरजुं व्यक्तींनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, त्यांचीही दिवाळी गोड व्हावी यासाठी प्रहार जनशक्ती पार्टी चे गजानन लोखंडकार व योगीराज घुले यांनी पुढकार घेवून गरजुंना मदतीचा हात दिला आहे.

गोरगरिबांना अश्या किट देण्यात आल्या.

दीपावली हा प्रकाशाचा उत्सव आहे. अंध:काराला घालवून देणारा उत्सव! हा आनंदाचा उत्सव आहे. दीपावली जवळ आली की तिच्या स्वागतासाठी सर्वांची लगबग सुरू होते. मात्र समाजातील गरीब कुटूंब या आनंदापासून दूर राहतात. त्यांनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, गोरगरीब व गरजु लोकांची दिवाळी गोड करण्याच्या उद्देशाने प्रहार जनशक्ती पाटी खामगाव व योगीराज घुले यांनी पुढकार घेवून गरजुंना अन्नधान्य किट, कपडे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचे काम केले आहे.

खामगाव तालुक्यातील माटरगाव मध्ये गरजुंना त्यांच्या घरी जावून अन्नधान्य किट, फराळख, मिठाईचे वाटप करण्यात आले. यामुळे अनेकांची दिवाळी आनंदमय बनली आहे.

पत्रकार बनायचे… कॉल करा..!U

यावेळी प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते गजानन लोखंडकार, योगीराज घुले, शहराध्यक्ष अक्षय हातेकर, सोपान घनमोडे, अमोल झाडोकार, शुभम डुकरे, सुनील गाढे, अक्षय आळशी, अनिल आळशी, पवन राऊत, वैभव घाटे, गोपाल शीत्रे, राहुल बेलूरकर, अंकित सोये, अजय घुले, श्रीकृष्ण वानखडे, गोपाल धोटे, राजेश राऊत आदी उपस्थित होते.