Home काव्य कट्टा वऱ्हाडी कट्टा (द मदर ब्रॅंच) चा स्नेहमिलन सोहळा १४ नोव्हेला शेगाव येथे...

वऱ्हाडी कट्टा (द मदर ब्रॅंच) चा स्नेहमिलन सोहळा १४ नोव्हेला शेगाव येथे !

शेगाव / प्रतिनिधी

रसिकाश्रयामुळे सामाजिक माध्यमावर प्रचंड लोकप्रिय असलेल्या वऱ्हाडी कट्टा (द मदर ब्रॅंच ) या कौटुंबिक परिवाराचा
दरवर्षी प्रमाणे यावर्षीसुध्दा.
पाचवा स्नेहमिलन सोहळा मथुरा लॉन शेगाव येथे आयोजीत केला आहे.
जेष्ठ तसेच युवा वऱ्हाडी साहित्यिक मान्यवरांच्या उपस्थितीत या स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन होणार आहे…
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड.श्री.अनंतजी खेळकर(हास्यकवी) तर उद्घाटक श्री.पुरुषोत्तम आवारे(संपादक दै.अजिंक्य भारत) तर जेष्ठ साहित्यिका प्रतिमाताई इंगोले.सप्तखंजेरीवादक प्रबोधनकार सत्यपाल महाराज.श्री. तेजेंद्रसिंग चौहान(मॅनेजमेंट कॉलेज).
श्री.नरेंद्र इंगळे(गुल्लेरकार).श्री. चंद्रकांत वानखडे. श्री.विनायक भारंबे(मथुरा लॉन) देवानंद पवार. प्रविण मुके.गोपालभाऊ कोल्हे…यांची प्रमुख उपस्थिती राहील…‌

हमसे जुडने के लिये संपर्क करे- 94 2323-7001

कौटुंबिक धाग्यात गुंफलेला नात्यागोत्यात विणलेल्या
वऱ्हाडी कट्टा समुहाचा दरवर्षी आयोजीत स्नेहमिलन सोहळा म्हणजे प्रत्येक वऱ्हाडी कट्टा सभासदा साठी आनंदमयी सोहळा असतो रक्ताच्या नात्या पलीकडे ही नाते जपणाऱ्या या वऱ्हाडी कट्टा समुहाच्या सोहळ्यात कट्टकरी बहिणींचा साळीचोळी देवुन सन्मान केला जातो
स्व.सांगिदासजी पनपालीया यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री. जगदिश पनपालीया यांच्या वतीने साळीचोळी भेट दिल्या जाते‌.
श्री. लक्षमणदादा दारमोडे रा कदमापुर ता.खामगाव
श्री. नितीन वानखडे सुटाळा ता खामगाव
श्री.राजेश गिरे खामगाव
डॉ.लक्ष्मण उगले रा. कारेगाव ता.खामगाव
श्री. राम पळसकार रा शहापूर ता.खामगाव
सौ.उज्वलाताई कांबळे अकोला
श्री.कुशल राऊत रा अडगाव ता तेल्हारा
वऱ्हाडी कट्टा संचालक मंडळ यांच्यावतीने कळविण्यात आले….
मथुरा लॉन ( रोकडीया हनुमान मंदीराजवळ) शेगाव जि.बुलढाणा
स्नेह मिलन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन वऱ्हाडी कट्टा परिवार तर्फे करण्यात आले आहे…

वऱ्हाडी कट्टा (द मदर ब्रॅंच)२०२१ चे साहित्य पुरस्काराचे वितरण

वऱ्हाडी कट्याचा यंदाचा सर्वाच्च जिवनगौरव पुरस्कार..
जेष्ठ साहित्यिक श्री.विजय पाटिल चितलवाडी जि.अकोला यांना तर
स्व.उज्वल विभुते साहित्य गौरव पुरस्कार युवा साहित्यिक श्री.अंकुश इंगळे मुंबई यांना तर काव्यगौरव पुरस्कार..प्रसिध्द कवियत्री..सौ वृषालीताई देवकर परतवाडा जि.अमरावती…तर यावर्षीपासुन नव्यानेच सुरु करण्यात आलेला गझलगौरव पुरस्कार कवी गझलकार श्री.नितीन देशमुख यांना देण्यात येणार आहे तर वऱ्हाडी कट्टा अमरावती परिवाराकडुन स्व.विनोदबाबु अकोटिया पुरस्कार कवी गझलकार अरविंद उन्हाळे. भोन जि.बुलढाणा यांना तर वऱ्हाडी कट्टा अमरवती परिवाराकडुन नव्यानेच सुरु करण्यात आलेला स्व.अतुल डिक्कर स्मृतीप्रित्यर्थ वऱ्हाडी कट्टा आपला माणुस पुरस्कार वऱ्हाडी कट्टा संस्थापक श्री राम पळसकार रा, शहापूर ता.खामगाव यांना दिल्या जाणार आहे…तसेच दररोज लिहले जात असलेल्या स्तंभलेखक व साप्ताहिक स्तंभलेखकांना सन्मान चिन्ह देवुन गौरवविण्यात येणार आ याहे.

तर वर्षभरात आयोजीत विविध स्पर्धा पुरस्कारांचे वितरण सुध्दा या सोहळ्यात होणार आहे.