Home Breaking News एल्गार मोर्चा रेकॉर्ड ब्रेक ! रविकांत तुपकर यांच्यासह तब्बल अडीच हजार आंदोलकांवर...

एल्गार मोर्चा रेकॉर्ड ब्रेक ! रविकांत तुपकर यांच्यासह तब्बल अडीच हजार आंदोलकांवर गुन्हे दाखल

बुलढाणा : देशातील शेतकरी सातत्याने संकटात आहे. यावर्षी नैसर्गिक व सुलतानी संकटाने शेतकरी हतबल झाला आहे. असंख्य शेतकरी Farmers आजही आत्महत्या करीत आहेत. अतिवृष्टीने खरीप गेलं आता रब्बी पीक घेण्यासाठी शेतकऱ्याजवळ पैसा नाही आणि अशा संकटातही केंद्र व राज्य सरकार (Central and State Governments) शेतकऱ्यांकडे पुर्णत: दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी केला आहे. तसेच या देशातील शेतकरी वाचवा अशी आर्त हाक तुपकरांनी यावेळी दिली आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन बुलडाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने भव्य एल्गार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी बांधव सामील झाले होते. शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये द्या, ओला दुष्काळ जाहीर करा, लोकडाऊन मधील वीज बिल पूर्ण माफ करा , शेतकऱयांचे वीज कनेक्शन कापणे बंद करा या मागण्या घेऊन रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शहरातील मोठी देवीला साकडे घालून जिल्हाधिकारी कार्यलयावर (Buldhana Collector’s Office) मोर्चा धडकला. जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री, कृषिमंत्री यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.

 

शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात आला. आधीच आसमानी व सुलतानी संकटाने मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने आंदोलन पुकारल्यामुळे कोविड नियमांचे उल्लंघन व सार्वजनिक रस्ता आडविल्या प्रकरणी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात मोर्चाचे नेतृत्व करणारे रविकांत तुपकर यांच्यासह 2200 ते 2500 आंदोलकांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने गुन्हे दाखल करण्याची ही पहिलीच वेळ असावी.

स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्यासह पवन देशमुख, आकाश मालोदे, शेख रफिक शेख करीम, रामेश्वर पवार, विनायक सरनाईक, राजेश पवार, बाळू केसकर,दीपक पाटील, संदीप मुळे, बबन चेके, श्याम अवथळे ,नितेश थिगळे, रवींद्र जेउघाले ,गंगाधर पडोळकर, हेमराज देशमुख,मंगल हिवाळे,प्राध्यापक अनिल रिंडे,डॉक्टर ज्ञानेश्वर टाले व इतर 2200ते 2500 आंदोलकांवर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे.

 

अश्या आहेत आंदोलकांच्या मागण्या

सोयाबीनचा प्रतिक्विंटल भाव किमान 8 हजार रुपये व कापसाचा प्रतिक्विंटल भाव किमान 12 हजार रुपये स्थिर राहावा यासाठी केंद्र सरकारने तात्काळ धोरण आखावे.

जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून अतिवृष्टीग्रस्तांना हेक्‍टरी 50 हजार रुपये मदत हेक्टरची मर्यादा न ठेवता तात्काळ देण्यात यावी.

मागील वर्षीचा व चालू वर्षी चा 100% पिक विमा देण्यासाठी कंपन्यांना बाध्य करावे.

नदीकाठच्या खरडून गेलेल्या शेतजमिनी तयार करण्यासाठी 100 टक्के नुकसान भरपाई देण्यात यावी

कृषी पंपाचे वीज बिल माफ लॉकडॉउन काळातील घरगुती वीज बिल माफ करावे व कनेक्शन कापणे तात्काळ थांबवावे, अव्वाच्या सव्वा बिले थांबावे.

कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम तात्काळ जमा करावी व नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान द्यावे.

सोयापेंड आयात त्वरित थांबवावी.
पाम तेल व खाद्य तेलावरील आयात शुल्क वाढवावे.

खाद्यतेल व तेल बियांवरील स्टॉक लिमिट अट शिथिल करावी.

सोयाबीनचे बाजार भाव 8 हजार रुपये असताना 5 हजार रुपयांनी सोयाबीन खरेदी करणाऱ्या महाबीजने भावफरक रक्कम अदा करावी.