प्रहार जनशक्ती पार्टीच्या सौ. स्फूर्तिताई निखिल पाटील गावंडे जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास समितीच्या सभापतिपदी !
अकोला: जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापतिपदी प्रहार जनशक्ती पार्टीच्या सौ. स्फूर्तिताई निखिल गावंडे शुक्रवारी विजयी झाल्या. या विजयानंतर प्रहारसह महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. विषय समिती सभापतिपदी सम्राट डोंगरदिवे आणि महिला व बालकल्याण समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत वंचितला मोठा झटका बसला असून या नव्या समीकरनाणे वंचितच्या गोटात सन्नाटा पसरला आहे.
वंचितच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र येत नसल्याने त्याचा फायदा आजपर्यंत वंचितला व्हायचा, आज मात्र समीकरण बदललेले दिसत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करतांना झालेल्या तांत्रिक चुकीमुळे वंचितला पहिला झटका बसला. नंतर झालेल्या निवडणुकीत महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदासाठी प्रहारच्या स्फूर्तिताई यांना 29 मते मिळाल्याने त्यांना विजयी घोषीत करण्यात आले. नुकत्याच पार पडलेल्या पोटनिवडणुकीत कुटासा मतदारसंघात विजयी झालेल्या प्रहारला सभापती पद मिळाल्याने प्रहारच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. पार्टीचे संस्थापक तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना . बच्चूभाऊ हे महिला व बालविकास विभागाचे राज्यमंत्री आहेत. पार्टीच्या उमेदवारालाच या खात्याचे सभापतीपद मिळाल्याने त्याचा लाभ सर्वाना होणार आहे.
Home Breaking News जे खाते प्रहारचे बच्चुभाऊ यांच्याकडे तेच खातं नवनियुक्त सभापती सौ. स्फूर्तिताई यांच्या...