Home बुलडाणा जिल्हा वृत्त ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा ! चैनसुख संचेती

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा ! चैनसुख संचेती

 

मलकापूर : उल्हास शेगोकार
महाविकास आघाडी च्या विरोधात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई , सरसकट कर्जमाफी , ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा यासह आदी मागण्यांबाबत २६ ऑक्टोबर रोजी माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी विरोधात घोषणाबाजी करीत मलकापूर नांदुरा, विधानसभा भाजपाच्या वतीने “आसूड मोर्चा” काढून उपविभागीय अधिकारी मलकापूर यांचे मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , जिल्ह्यात तीन वर्षांपासून सतत वादळ , गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . रब्बी व खरीपातील पिके शेतकन्यांची हातची गेल्याने शेतकरी राजा हवाल दिला झाला आहे . शेतकऱ्यांना दोन वर्षापासून ना भरीव नुकसान भरपाई मिळाली ना पीक विम्याची रक्कम मिळाली तरी शेतकऱ्यांना सरकारचा आधार उरलेला नाही व विमा कंपन्यांवर कुठलाही वचक राहिलेला नाही . शेतकरी राजावर ओढवणाऱ्या या संकटामुळे नैराश्यातून शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण सुध्दा वाढले आहे . या सरकारला कुठलीही शेतकऱ्यांबद्दल दयामाया दिसत नाही.शेतकऱ्यांना राज्य शासनाद्वारे कोरवाहू करीता हेक्टरी २५ हजार मदत द्या यासह विविध प्रकारच्या मंगण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी माजी आमदार चैनसुख संचेती ,मोहन शर्मा, मिलिंद डवले, संजय काजळे,सौ.उमाताई तायडे,सुरेशभाऊ संचेती, आनंदराव सिरसाट,बलदेव राव चोपडे, शंकर पाटील, सुभाष चव्हाण ,संतोष बोंबटकर , गौतम तायडे, योगेश पटणी, रामभाऊ झामरे, राहुल देशमुख, अश्विनी पाटील, अश्विनी देशमुख, सुवर्णा चोपडे, लताताई ठोंबरे संगीता काळे, नागेश सूरांगे, बबलू देशमुख, यासह कार्यकर्ते , पदाधिकारी उपस्थित होते.