Home Breaking News देवदर्शनासाठी निघालेल्या अकोला येथील भाविकांवर काळाचा घाला; पाच जणांचा मृत्यू

देवदर्शनासाठी निघालेल्या अकोला येथील भाविकांवर काळाचा घाला; पाच जणांचा मृत्यू

तीन वाहनांचा विचित्र अपघात होवून ५ जण ठार; ४ गंभीर
खामगाव- देवदर्शनासाठी निघालेल्या अकोला येथील भाविकांच्या वाहनाला अपघात होऊन ५ जण ठार झाले तर ४ जण गंभीररित्या जखमी झाले. ही दुर्घटना आज सकाळी चिखली रोडवरील मोहाडीनजिक घडली. सर्व जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अकोला येथील ९ जण आज सकाळी टाटासुमो क्र.एमएच३०एए २२५५ ने पंढरपूर येथे दर्शनासाठी निघाले होते. दरम्यान मोहाडीनजिक वळणावर समोरुन भरधाव वेगात येणाऱ्या दोन मालवाहू वाहनांनी त्यांच्या सुमोला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, सुमोमधील विश्वनाथ कराड(७३) शकुंतला विश्वनाथ कराड(६५) बाळकृष्ण हरीभाऊ खर्चे(७०) व शामसुंदर रोकडे(६५) हे चौघे जागीच ठार झाले तर सौ.सुनंदा मुरलीधर रोहणकार(६०) यांचा दवाखान्यात नेत असतांना वाटेतच मृत्यू झाला.

 

अपघातातील गंभीर जखमी सौ.अलका खर्चे,शामराव ठाकरे, उषा ठाकरे व मुरलीधर रोहणकार यांच्यावर अकोला येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. या अपघातामुळे काहीवेळपर्यंत चिखली मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.