Home शैक्षणिक तरुणाईच्या जल्लोषात कॉलेज ऑफ मॅनेजमेंटच्या प्रथम वर्षाला प्रारंभ

तरुणाईच्या जल्लोषात कॉलेज ऑफ मॅनेजमेंटच्या प्रथम वर्षाला प्रारंभ

 

नियमितता हेच यशाचे गमक – प्राचार्य राहुल अग्रवाल यांचे प्रतिपादन

खामगाव : तब्बल दोन वर्षांच्या विश्रांति नंतर आज प्रथमच खर्‍या अर्थाने महाविद्यालये मुलांनी सजलेली होती. शरीराला जशी हृदयची आवश्यकता तशीच विद्यालयाला विद्यार्थ्यांची गरज आणि आज खर्‍या अर्थाने दिमाखदर कार्यक्रमात कॉलेज ऑफ मॅनेजमेंट च्या प्रथम वर्षाला प्रारंभ करण्यात आला. सुरवातीला दीप प्रज्वलन करून विद्येची आराध्य देवता माँ सरस्वती चे पूजन करण्यात आले. यानंतर आलेल्या नवतरून विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देवून प्राचार्यांसह सर्व विभाग प्रमुखांनी स्वागत केले. यावेळी प्राचार्य राहुल अग्रवाल यांनी मार्गदर्शन करीत असतांना नियमितता, निरंतरता, परिश्रम आणि जिद्द तसेच ज्ञान आणि मेहनत ही यशाचे मुख्य स्त्रोत आहेत. विद्यार्थी दशेत आजचे काम आजच याला न्याय देणारे यशाचे शिखर गाठतात. तेव्हा नियमितता जीवनात आंगीकरा आणि विजयाचे शिल्पकार बना. कारण हा देश तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो आणि या उज्ज्वल देशाचे भविष्य तुम्ही तरुण आहात. यासोबतच प्रत्येक विभाग प्रमुखांनी आपला मनोदय व्यक्त करीत ध्येयासक्ती धडपड करणारे ध्येय प्राप्त करतात. व अश्या विचारांसह प्रत्येक विभाग प्रमुखांनी आपआपल्या विभागाची विस्तार पूर्वक माहिती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविली यामध्ये बि.कॉम. मराठी चे विभाग प्रमुख प्रा. विलास बर्डे, प्रा. वरूनराज आटोळे, प्रा. गौरव माने, प्रा.ज्योति अग्रवाल यांनी समयोचित मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. यावेळी मंचावर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र संयोजक सुदाम जाधव हे उपस्थित होते.
उच्च माध्यमिक परीक्षेमध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच गणेशोत्सव मध्ये घेण्यात येणार्‍या निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेल्या वैष्णवी रविंद्र देशमुख, द्वितीय क्रमांक वृशाली गुणवंतराव वांढे, तृतीय क्रमांक संयुक्त रित्या नकुल बेलूरकर आणि शुभांगी बोदडे यांचा सन्मान करण्यात आला.
लक्ष्मीनारायण ग्रुप मधील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारी एकमेव संस्था म्हणून नावलौकिक आहे. या संस्थे अतर्गत जास्तीत जास्त वेगवेगळे कौशल्ये जोपासले जातात तसेच क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना नवीन मंच उपलब्ध करून देण्यास तत्पर असते.
आयोजित कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा.संजय पाटील, प्रा. विजय दांडगे, प्रा. पुष्पा जावरे, प्रा. वैशाली पुदागे, प्रा.शीतल राठी, प्रा.कोमल उन्हाळे, प्रा. विनोद डाबरे, प्रा. किरण देवधर, सुलोचना गणोरकर, शोभा पवार, विजया बदामे, खुशाली जोशी, रिता श्रीनाथ, नीलेश महाजन, आनंद ढोरे, प्रसाद चव्हाण, नीलेश काटे, नंदुसिंग चव्हाण यासह कार्यक्रमाला कोरोना नियम पाळून बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास पल्हाडे व आभार प्रदर्शन प्रा. अतुल पाटील यांनी केले.