Home Breaking News भाजपाच्या आसूड मोर्चात हजारो शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे : लोकेश राठी

भाजपाच्या आसूड मोर्चात हजारो शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे : लोकेश राठी

संग्रामपूर तालुक्यामध्ये कधी ओला तर कधी कोरडा अशा दुष्काळाने शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट हेक्टरी ५०,००० रुपयाची मदत शेतकऱ्यांना देण्यात यावी, २०१९/२० च्या पिक विम्याच्या मदतीमध्ये भेदभाव करत शेतकऱ्यांना पिकविम्या पासून वंचित ठेवले व भेदभाव करून काही भागात नगण्य विमा दिला. २०२०/२१ या वर्षीचा पिक विमा सर्व शेतकऱ्यांना कुठलाही भेदभाव न करता सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावा, आजपर्यत थकीत असलेले पिक कर्ज शेतकऱ्यांना माफ करून दिवाळी पूर्वी नवीन कर्ज शेतकऱ्यांना देण्यात यावे या प्रमुख मागण्यासाठी माजी कॅबिनेट मंत्री तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आमदार डॉ संजय कुटे यांच्या नेतृत्वात भव्य आसूड मोर्चा उपविभागीय कार्यालयावर 26 ऑक्टोबर रोजी जळगाव जामोद येथे काढण्यात येत आहे. तरी सर्व सन्माननीय जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी,शहर पदाधिकरी सर्व जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सभापती उपसभापती सदस्य तसेच सर्व आघाड्यांचे,मोर्चा,व सेल चे अध्यक्ष तथा पदाधिकारी जिल्हा तालुका व शहर महिला आघाडी,सर्व शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख व सर्व सन्माननीय ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्व शेतकऱ्यांनी या आसूड मोर्चा मध्ये सर्व ताकदनिशी उपस्थित राहून या महाविकास आघाडी सरकार चा जाहीर निषेध करण्यासाठी आसूड मोर्चा मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी तालुका व शहर संग्रामपूर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी हजर रहावे असे आव्हान लोकेश राठी भारतीय जनता पार्टीचे संग्रामपुर तालुका अध्यक्ष यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here