Home Breaking News अखेर Bjp चा ‘बाबू बन गया शिवसेना मॅन’ ; नवा राजकीय चेकमेट!

अखेर Bjp चा ‘बाबू बन गया शिवसेना मॅन’ ; नवा राजकीय चेकमेट!

 

खामगाव – शिवसेनेच्या खामगाव  शहर प्रमुखपदी  येथील ऍड रमेश उर्फ बाबू भट्टड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन राजकीय समीकरण समोर येत आहे.

शहरात गेल्या काही दिवसा पासून राजकीय वातावरण गरमा गरम होते. भाजपात नगरसेवक संदीप वर्मा आणि वंदेमातरम मंडळ व काही पदाधिकारी असा वाद सुरू होता. वर्मा यांनी पदाचा राजीनामा दिला आणि परत घेतला. त्यांनतर धमकी मिळत असल्याचे आरोप केले. दरम्यान त्यांना भारतीय जनता पक्षाने निलंबित केले होते. दरम्यान याच दिवसात शिवसेना शहर प्रमुख निविडीची प्रक्रिया सुरू होती. संदीप वर्मा समर्थक नंदू भट्टड, निलेश देवताळू व अन्य नावे चर्चेत होती. मात्र अचानक ऍड बाबू भट्टड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खुद्द खा. प्रतापराव जाधव यांनी ऍड. बाबू भट्टड यांना नियुक्ती पत्र दिले. यावेळी सुरेश वावगे, हरिदास हुरसाड यांच्या सह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

कोण आहेत बाबू भट्टड
ऍड. रमेश उर्फ बाबू भट्टड हे व्यवसायाने वकील आहेत. एक हिंदुत्ववादी विचारधारा असलेल्या भाजपा- शिवसेनेसोबत ते गेल्या अनेक वर्षे जुळले आहेत. शिवसेनेचे खासदार यांच्या राजकीय कॅम्पेनमध्ये त्यांचा सहभाग असतो. उद्धव ठाकरे सह मोठ्या नेत्यांच्या सभांचे संचलन त्यांनी केलेले आहे. स्व. भाऊसाहेब फुंडकर यांचे ते जवळचे कार्यकर्ते होते.

संदीप वर्मा यांना चेक मेट

ऍड. बाबू भट्टड यांचा शिवसेना प्रवेश संदीप वर्मा यांना चेक मेट मानला जात आहे. भाजपने निष्कासित केल्यावर वर्मा यांच्याकडे शिवसेना हा मोठा पर्याय होता. मात्र आता हा पर्याय उरला नाही. त्यामुळे आता खामगावच्या राजकारणात काय काय घडते हे पाहावे लागणार आहे. अखेर भाजपा का बाबू बन गया शिवसेना मॅन अशी चर्चा रंगत आहे.