Home Breaking News मातेने घेतला असा चुकीचा निर्णय; दोन वर्षाच्या मुलावर कोसळलं आभाळ

मातेने घेतला असा चुकीचा निर्णय; दोन वर्षाच्या मुलावर कोसळलं आभाळ

 

जळगांव जा. : भेंडवळ येथील 29 वर्षीय विवाहितेने आपल्या राहत्या घरातच पंख्याला साडी बांधून गळफास घेतल्याची घटना 22 ऑक्टोंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली आहे या घटनेमुळे भेंडवळ गावात एकच खळबळ उडाली होती. या घटनेची फिर्याद जळगाव जामोद पोलीस स्टेशनला सुनील डोंगरदिवे यांनी दिली यांच्या फिर्यादीवरून जळगाव जामोद पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर भास्कर, पोलीस कॉस्टेबल प्रेमसिंग पवार, पोलीस कॉन्स्टेबल सुनील वावगे, पोलीस कॉन्स्टेबल शेख इरफान हे घटनास्थळी पोहोचून त्यांनी पंचनामा करून प्रेत उत्तरक्रिया करिता जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये करण्यात आले.

सदर मृतक विवाहित महिलेचे नाव दिक्षा सुनील जाधव वय 29 वर्ष राहणार भेंडवळ बुद्रुक असे असून तिचे लग्न 2017 मध्ये सुनील जाधव यांच्याशी झाले होते त्यांना 2 वर्षाचा मुलगा आहे. पोलिसांनी मर्ग दाखल करीत अकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. सदर महिलेने आत्महत्या का केली याचे कारण कळू शकले नाही या घटनेचा पुढील तपास जळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर भास्कर व कॉन्स्टेबल प्रेमसिंग पवार हे करीत आहेत.