Home खामगाव विशेष शेतकऱ्यांची फसवणुक करणाऱ्या पीक विमा कंपनीविरुध्द तात्काळ कार्यवाही करावी : राणा दिलीपकुमार...

शेतकऱ्यांची फसवणुक करणाऱ्या पीक विमा कंपनीविरुध्द तात्काळ कार्यवाही करावी : राणा दिलीपकुमार सानंदा

उपविभागीय अधिकारी यांना घातला घेराव

खामगाव:- शेगांव तालुक्यातील जलंब मंडळातील शेतकऱ्यांच्या पिकांचे सन 2020 मध्ये झालेल्या अवकाळी पाउस व अतिवृष्टीमुळे पुर्णपणे नुकसान झाले होते. त्यावेळी विमा काढलेल्या शेतकऱ्यांना पिकविमा कंपनीने नुकसान भरपाई न दिल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. विषेश म्हणजे जलंब लगतच्या मंडळात पीक विमा मंजुर झाला तर जलंब मंडळाला विम्यापासून वगळण्यात आले. त्यामुळे जलंब येथील शेकडो शे तकरी संतप्त झाले असून या शेतकऱ्यांनी दि.20 ऑक्टोंबर 2021 रोजी शांततेच्या मार्गाने खामगांव येथील उपविभागीय अधिकारी यांना घेराव घातला. यावेळी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी उपविभागीय कार्यालयावर जावुन शेतकऱ्यांची भेट घेतली व त्यांचेशी चर्चा करुन पिकविमा संदर्भात अडचण जाणुन घेतली.

याप्रसंगी जलंब येथील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांची भेट घेवुन पिकविम्याच्या लाभापासून वंचित असलेल्या नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना पिकविम्याची रक्कम त्वरीत मिळावी या मागणी संदर्भाचे निवेदन सादर केले. यावेळी शेगांवचे तहसिलदार समाधान सोनोने, खामगांवचे तहसिलदार अतुल पाटोळे,नायब तहसिलदार यांची उपस्थिती होती.यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांचेशी पिकविम्याबाबत चर्चा केली.मागील वर्शी जलंब येथील पिक आणेवारी 46 टक्के एवढी कमी असतांना सुध्दा कुठल्याही प्रकारचा 2020 चा पिकविमा शेतकऱ्यांना मिळाला नाही.त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे तसेच 2020 च्या मंजुर झालेल्या पिकविम्यामध्ये पिकविमा कंपनी व प्रषासन यांनी कोणत्या निकशाच्या आधारे जलंब महसुली मंडळाला वगळले आहे असे सांगुन शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई न मिळाल्याबदद्ल रोष व्यक्त केला. यावेळी उपविभागीय अधिकारी यांनी प्रशासनाकडूनच लवकरच रिलायन्स जनरल इन्शुरन्स,पिकविमा कंपनीचे एजंट, शेगांव तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी,पटवारी यांच्यासोबत तातडीची बैठक घेवून पिकविम्याचा प्रश्न निकाली काढण्यात येईल असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जर पिकविमा मिळाला नाही तर शेतकऱ्यांच्या वतीने अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इषारा यावेळी शेतकरी बांधवांनी दिला.
याप्रसंगी शेगांव तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय काटोले,पंचायत समिती सदस्य विठठ्ल सोनटक्के,माजी जि.प.सभापती सुरेश वनारे, बाजार समितीचे माजी संचालक पंजाबरा देशमुख,स्वप्नील ठाकरे पाटील,उत्तम घोपे,सतीश सोनटक्के, राजेशअवचार,महादेव सोनटक्के, रामभाऊ धामणकार,अरुण काळे, संजय राजपुत, संदिप सोनटक्के,अमोल जवळकार, श्रीकृष्ण तांदुळकार, गणेश देवचे, गोपाल मोहे, प्रतापसिंग राजपुत,मनोहर बोडखे, रामकृष्ण मोहे, दादाराव देशमुख यांच्यासह जलंब येथील शेकडो शेतकरी उपस्थित होते.