Home Breaking News शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपाचा जिल्हाभरातील उपविभागीय कार्यालयावर “आसूड मोर्चा”

शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपाचा जिल्हाभरातील उपविभागीय कार्यालयावर “आसूड मोर्चा”

26 ऑक्टोंबर खामगांव, जळगांव, मलकापूर, चिखली विधानसभा तर दि.27 मेहकर, सिंदखेड राजा, बुलढाणा विधानसभा शेतकरी बांधवांनी आपल्या हक्कासाठी हजारोच्या संख्येने या “आसूड मोर्चा”त सहभागी व्हा – आ.ॲड.आकाश फुंडकर जिल्हाध्यक्ष

खामगाव :राज्यात आघाडी सरकार आल्यापासून शेतकरी संकटात सापडला आहे. हे दळभद्री सरकार आल्यापासून राज्यातील शेतकऱ्यांवर आसमानी संकट सतत ओढवत आहे. त्यामुळे शेतकरी पुरता मेटाकूटीस आला आहे. शेतकऱ्यांची आर्थीक स्थिती सुधारण्या ऐवजी दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. त्यावर राज्यसरकार कोणतीच मदत जाहीर करीत नाही व कोणतीच मदत देखील देत नाही. आज अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत. तरी शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता या बिघाडी सरकारला जाब विचारुन हालवून सोडावे. या सरकारच्या विरोधात हक्काच्या लढयात सहभागी व्हावे असे आवाहन आ. ॲड. आकाश फुंडकर जिल्हाध्यक्ष यांनी केले आहे
आम्ही मदत जाहीर करणार नाही सरळ खात्यात देऊ म्हणणाऱ्या राज्य सरकारने आज राज्यासह जिल्हाभरातील शेतकरी मोठया संकटात सापडला असतांना एक रुपया देखील शेतकऱ्यांच्या खात्यात दिलेला नाही. पिक विम्याची रक्कम ज्यांना मिळाली ती अतिशय तुटपूंजी आहे. अनेक शेतकऱ्यांना तर केवळ 100 ते 200 रुपए ‍ पिक विमा मिळालेला आहे. हे सर्व अन्यायकारक असून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या हलाखीच्या व आपत्तीच्या वेळेस सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन मदत करावी. हे विश्वासघातकी सरकार म्हणते “आम्ही जाहीर करत नाही आम्ही सरळ खात्यात जमा करु” पण आता पर्यंत ना गारपिटीची मदत, ना 50पैसे पेक्षा आणेवारी असूनही हेक्टरी मदत जाहीर झाली नाही, अतिवृष्टी झालेल्या, वादळाचा तडाखा बसलेल्या शेतक-यांना मदत जाहीर झाली नाही व खात्यातही आली नाही.
जिल्हयातील शेतकऱ्यांचा सोयाबीन,ज्वारी,उडीद, मूग, कापूस हातचा गेला. पण सरकारला काही पाझर फुटत नाही. सतत पाऊस सुरु आहे, सर्वदूर अतिवृष्टी, ढगफूटी सदृष्ट पाऊस झाला आहे, सुरु आहे. शेतकऱ्याचा दसरा ओल्या दुष्काळामुळे खाली गेला. ना मुलांना कपडे लत्ते, ना काही. आता दिवाळी 12 दिवसावर येऊन ठेपली आहे. परंतु सरकारच्या अजूनही ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत काहीच हालचाली नाहीत. संकटात सापडलेले अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत त्यांनी आत्महत्या करु नये तर या सरकारला जाब विचारावा या सरकारला हालवून सोडाव.
राज्य सरकार कुंभकर्णी झोप घेण्याचे सोंग घेत आहे. सरकार कुठे आहे हा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे. भाजपा काळात शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे होत होते. परंतु हे सरकार म्हणते, तुम्ही तुमच्या शेतात जाऊन फोटो काढा ज्या शेतातील पिक पुर्ण पाण्याखाली गेले त्या शेतात शेतकरी जाणार तरी कसा ? जे काम सरकारला करायला हवे ते संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सांगून सरकार आपली जबाबदारी झटकत आहे. उद्या सरकार म्हणायला मोकळे की ज्यांनी फोटो काढून पाठविले त्यांना मदत देऊ, सरकार चालवावी लागते सरकार चालत नसते ! मागील 2 वर्षापासून केवळ आणि केवळ भ्रष्टाचार करण्यात व तो दाबण्यात सरकारचा वेळ चालला आहे. पण सर्व सामान्य जनता व नागरीक, शेतकरी हे मरणाच्या दारात उभे आहे. सरकार जागे व्हा !
झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या तर्फे दि.26 ऑक्टोंबर 2021 रोजी जिल्हयातील खामगांव, जळगांव, मलकापूर, चिखली विधानसभा मतदार संघात तर दि 27 ऑक्टोंबर 2021 रोजी मेहकर, सिंदखेड राजा, बुलढाणा या विधानसभा मतदारसंघात भाजप ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी “आसूड मोर्चा” काढणार आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसह पिकविमा, गारपिट मदत, हवामान आधारीत फळ, पिक विमा मिळण्यासाठी प्रचंड शेतकरी आसूड मोर्चा काढण्यात येणार आहे.
तरी जिल्हाभरातील भाजपाच्या लोकप्रतिनिधी, जि.प. , पं.स. सदस्य, नगरसेवक, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच आपदा ग्रस्त सर्व शेतकरी बांधवांनी या मोर्चात मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आ.ॲड.आकाश फुंडकर भाजपा जिल्हाध्यक्ष यांनी केले आहे.