प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे जिल्हाधिकारी कडे आदिवासी जनता दलाची मागणी
अमोल ठाकरे
संग्रामपूर : तालुक्यामधील मागील तीन ते चार महिन्यापासून आदिवासी विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे जात प्रमाणपत्र प्रलंबित असून ते तात्काळ देण्यात यावे सदर प्रमाणपत्र नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे विद्यार्थी अनेक योजनांपासून वंचित राहतात त्यामुळे सदर विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र तात्काळ मिळावे अशा आशयाचे निवेदन तहसीलदार संग्रामपूर मार्फत जिल्हाधिकारी यांना आज देण्यात आले सदर निवेदनावर सोपान सोळके विदर्भ अध्यक्ष आदिवासी जनता दल, विलास घटे, इमाम सुरत्ने, विलास केदार, मारुती सोळुंके आधी पदाधिकार्यांच्या सह्या आहेत