Home वुमन स्पेशल शेगावच्या जयश्रीने राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक 

शेगावच्या जयश्रीने राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक 

शेगावच्या शहरवासीयांकडून सत्कार

शेगाव,ता.२० येथील क्रीडापटू कुमारी जयश्री रेखा शेटे हिणे कर्जत तालुक्यात पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविला आहे त्याबद्दल शहरवासीय कडून तुम्हारी जयश्री चे जोरदार स्वागत करण्यात आले. शेगाव येथील सामाजिक धार्मिक व राजकीय क्षेत्रामध्ये अग्रेसर रेखा शेट्टे यांना दोन मुली असून कुमारी जयश्री ही त्यांची लहान लेक आहे. रेखा शेटे यांनी त्यांच्या दोन्ही मुलींना मुलाप्रमाणे वाढवून त्यांना उच्च शिक्षित करण्याचा निश्चय केला. व दोघी मुलींना श्री संत गजानन महाराज इंग्लिश शाळे मध्ये प्रवेश मिळवून दिला. कुमारी जयश्री व तिची मोठी बहीण या दोन्ही बहिणी अभ्यासात अतिशय हुशार असून त्यांना विविध क्रीडा क्षेत्राची आवड आहे त्यांची आवड लक्षात घेता रेखा शेटे यांनी दोन्ही मुलींना क्रीडा क्षेत्रात पारंगत ठेवण्याकरिता या मुलींना तज्ञ प्रशिक्षका कडून प्रशिक्षण मिळवून दिले. नुकत्याच पार पडलेल्या कर्जत तालुक्यात राज्यस्तरीय पेंचाक सिलाट क्रीडा स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्यासंघाकडून खेळून संघाने तिसरे स्थान पटकावले तर जम्मू काश्मीर आणि हरियाणा येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कुमारी जयश्री शेटे हिने व्यक्तिगत सुवर्ण पदक पटकावले तिच्या या यशामुळे शेगाव वासियांना आनंद झाला असून जयश्री हिनेआपल्या यशाचे श्रेय स्वतःच्या आईला देताना म्हटले की आईने आम्हाला वाढविताना कधीही मुला मुलीचा भेदभाव केला नाही आईमुळेच मला प्रेरणा मिळाली असून माझी आवडती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून खुद्द माझी आईच आहे अशी प्रतिक्रिया सुवर्ण पदक मिळविल्यानंतर कुमारी जयश्री शेटे हिणे व्यक्त केली. शेगाव येथे तिचा अशोक मांजरे अनिता मांजरे अहिरे सर दीपक पांडे छोटू पाटील ठाकरेसर,शिक्षक नेते गोपाल सूरे,पतसंस्था अध्यक्ष टोहरे साहेब,यांच्यासह तिची आई रेखा शेटे हिचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.