Home Breaking News संग्रामपूर तालुक्यात वाघाची दहशत दोन दिवसात वाघाच्या हल्ल्यामध्ये एक म्हैस व एक...

संग्रामपूर तालुक्यात वाघाची दहशत दोन दिवसात वाघाच्या हल्ल्यामध्ये एक म्हैस व एक बैल ठार

वाघाला जेरबंद करण्याची नागरिकांची मागणी

संग्रामपूर तालुक्यातील परिसरात गत दोन ते तीन दिवसापासून वाघाची दहशत सुरू आहे तसेच या वाघाने दोन ते तीन दिवसांमध्ये आतापर्यंत दोन जनावरांवर हल्ला केलेला असून या वाघाच्या हल्ल्यामध्ये शेतखेडा येथील एका शेतकऱ्यांच्या एका म्हशी वर हल्ला केल्याने एक म्हैस ठार झाली आहे तर लाडणापुर येथील एका शेतकऱ्याच्या शेतात असलेल्या बैलावर या वाघाने हल्ला केल्याने एक बैल ठार झाला आहे.

वाघ या परिसरात दिसत असल्यामुळे गावकरी व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे गत दोन दिवसापूर्वी करमोळा शिवारात वाघाच्या पायाचे ठसे दिसून आले होते त्यानंतर शेतखेडा येथील रामेश्वर पाटील यांच्या शेतात असलेल्या गोठ्यातील एका म्हशीवर या फिरत असलेल्या वाघाने या म्हशी वर हल्ला केल्याने हि म्हैस जागेवरच ठार झाली होती तर सोमवारी रात्री लाडणापुर येथील रामभाऊ बोदडे यांच्या शेतात असलेल्या गोठ्यामध्ये गुरेढोरे बांधून ठेवली होती मात्र रात्री या गोठ्याजवळ वाघ गेल्याने या वाघाने गोठ्यातील एका बैलावर मध्यरात्री हल्ला केल्याने हा बैल जागेवरच ठार झाला आहे.
वाघाच्या हल्ल्यात गुरेढोरे मरत असल्यामुळे त शेतकऱ्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान होत आहे त्यामुळे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ या वाघाला जेरबंद करावे अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.