Home निवड - नियुक्ती रविकांत माहुलीकर यांची राष्ट्रीय फुले ब्रिगेडच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी निवड

रविकांत माहुलीकर यांची राष्ट्रीय फुले ब्रिगेडच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी निवड

 

खामगाव : येथील सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते रविकांत माहुलीकर यांची राष्ट्रीय फुले ब्रिगेडच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे.
रविकांत माधवराव माहुलीकर हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजकारण आणि राजकारणात सक्रिय आहेत. तसेच तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून ते काम करत आहेत. बुलढाणा जिल्हा तसेच राज्यात चांगला जनसंपर्क असल्याने राष्ट्रीय फुले ब्रिगेडची मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. संघटनेचे प्रदेश अध्यक्ष हनुमंत लांडे रविकांत माहुलीकर यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश सरचिटणीस पदी केली आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.