Home जागर श्री क्षेत्र निंबादेवी : एक जागृत देवस्थान

श्री क्षेत्र निंबादेवी : एक जागृत देवस्थान

बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात येत असलेले श्री क्षेत्र निंबोळा हे एतिहासिक व पुरातन काळापासून जागृत देवस्थान आहे. अखंड भारत वर्षातील 64 शिखर योगिनी धारी एकमेव मंदिर असल्याने ह्या शक्ती पिठाचा महिमा अलौकिक आहे. महंत दामोदर दासजी महाराज यांच्या पावन स्पर्शाने व पवित्र निवासाने पुर्नित झालेले हे तिर्थक्षेत्र नांदुरा मलकापूर राष्ट्रीय महामार्ग सहा वर वडनेर भोलजी दक्षिनेस 3 कि.मी .अंतरावर आहे.
विदर्भ खानदेश सीमेवर असलेला या पवित्र तीर्थक्षेत्रास इतिहासिक ऐतिहासिक व पौराणिक इतिहास आहे श्री क्षेत्र निंबादेवी निंबोळ्याचे महात्म्य निसर्गरम्य परिसरात असलेल्या हेमाडपंथी मंदिरात श्री महासरस्वती श्री महासरस्वती श्री महालक्ष्मी व श्री महाकाली अशा तीन देवीच्या रूपात तीन प्रतिमा( बाण रूपात) स्वयंभू विराजमान आहेत . गोमुखातून विराजित सरस्वती नदी, श्री महालक्ष्मीचे, प्रतीक कमलविलासीनी कमळजा नदि व श्री विश्व महाकालीचे प्रतीक विश्वगंगा नदी असा तीन पवित्र नद्यांचा त्रिवेणी संगम येथे पहावयास मिळतो. या पवित्र संगमावर नैसर्गिक रित्या नदीच्या पात्रात असलेल्या काळ्या पाषाणावर तीन पिंडी ,नंदी मुख व गोखुर उमटलेल्या दिसून येतात.येथील पिंडीचा आकार त्रंबकेश्वर,ओंकारेश्वर व घ्रुष्णेश्वराच्या पिंडी प्रमाणे दिसून येतो. अशा नैसर्गिक पिंडी ज्या संगमावर दिसून येतात तो संगम शास्त्रीय दृष्टीने पवित्र मानला जातो. प्रभु श्रीरामचंद्रांच्या पावन स्पर्शाने हे तीर्थक्षेत्र पावन झालेले असून पूर्वी पुराणकाळातील दंडकारण्याचा हा भाग असल्याचे पुरावे जाणकारांजवळ असल्याची माहिती मिळते . अमावस्या, पौर्णिमा आणि सोमवती अमावस्या हे मासिक पर्व काल विशेष मानल्या जात असल्याने पुरुष तथा महिला भक्त संगमावर पवित्र स्नानासाठी येत असतात. त्यामुळे हे पर्व काल विशेष मानले जातात .येथील अखंड वाहणाऱ्या कुंडातील पवित्र जलतीर्थाने आंघोळ केल्याने सर्व प्रकारच्या व्याधी नष्ट होतात असा भाविकांचा अनुभव आहे.
ब्रह्मलीन तुकडोजी महाराज यांची प्रेत रक्षा याच संगमावर यांच्या इच्छेनुसार विसर्जित करण्यात आलेली आहे. या ठिकाणी राष्ट्रसंतांच्या पादुकांची स्थापना त्यानिमित्ताने करण्यात आलेली आहे. भाविकांच्या सोयी सुविधा साठी मंगल कार्यालय आणि सर्व सोयींनी युक्त सभागृह शासनाच्या निधीतून भक्त-निवास बांधण्यात आले आहेत.संस्थानच्या वतीने दरवर्षी गुढीपाडवा आणि नवरात्र उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत असतो यानिमित्ताने नवरात्र पर्वामध्ये हजारो भाविक भक्त दर्शनार्थ या तीर्थक्षेत्रावर येत असतात तर नववर्ष गुढीपाडवा पर्वावर येथे फार मोठी यात्रा भरत असते. सध्या नवरात्र पर्व सुरू असल्याने भाविकांची मांदियाळी या तीर्थक्षेत्रावर दिसून येत आहे. संस्थानचे अध्यक्ष नानासाहेब देशमुख व विश्वस्त मंडळ भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी सातत्याने प्रयत्नरत आहेत.
-संकलन


प्रफुल्ल उल्हास बिचारे
पत्रकार, मुरंबा ता. नांदुरा
*मोबा.९६२३९५१२०१*