Home Breaking News झाडेगांव येथील जिल्हा परिषद  शाळेची इमारत शिकस्त; विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका!

झाडेगांव येथील जिल्हा परिषद  शाळेची इमारत शिकस्त; विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका!

चंदु पाटील

झाडेगाव :वर्ग १ ते वर्ग ७ पर्यंत जि.प.शाळा असून विद्यार्थी पटसंख्या ५ वी ते ७ पर्यत ४७ विद्यार्था आहेत व ५ शिक्षक आहेत. कोरोना संक्रमण आजारामुळे शासनाने संपूर्ण शाळा बंद ठेवलेल्या होत्या .  शाळा वर्ग ५ वी ते ७ वी सुरु केले आहेत. लॉकडाऊन च्या वेळेत शाळा बंद असल्यामुळे जि.प. शाळेच्या इंग्रजी कौलांवर जंगली बांदर कुडल्यामुळे संपूर्ण शाळेच्या छतावरील कवेलू पूर्णपणे फुटलेले आहेत.

ज्या लाकडांवर कवेलू ठेवलेले आहेत ते लाकूड सुद्धा मुडलेले आहेत.फुटलेल्या कवेलुंमधून शाळेच्या वर्गाखोल्यांमध्ये संपूर्ण पावसाचे पाणी गळाले त्यामुळे वर्गाखोल्यातील फरशी भुसभुशीत होऊन त्या फरशिखली उंदीर,बेडूक,साप यांनी घर मांडलेली आहेत.कवेलुखलाचे लाकूड तुटल्यामुळे हे फुटलेले कवेलु विद्यार्थ्याचा केव्हा डोक्यात पडून विद्यार्थ्यास केव्हा जीवितहानी होईल याची शक्यता नाकारता येत नाही.व विद्यार्थी  वर्गात बसल्यानंतर  विद्यार्थ्यांना सरपटणाऱ्या प्राण्यांची सुद्धा भीती निर्माण होईल. त्याचप्रमाने शाळेचे जिथं प्रार्थना होते त्या टीनावरील मुंडाली ला सुद्धा  मोठी भेग पडलेली आहे टीनाखलाचे लाकडी खांब सुद्धा शिकस्त झालेले आहेत.व टिनाच्या मुंडालीवर गवत निघालेले आहे. शाळा प्रशासनाचा हा सर्व प्रकार विद्यार्थ्याच्या जीवाशी खेळण्या सारखा झालेला आहे.म्हणून विद्यार्थ्याच्या जीवाचा धोका लक्षात घेता जि.प.शाळा व्यवस्थापन समिती व पंचायत समिती प्रशासन शेगांव यांनी तात्काळ जि.प.शाळेची दुरुस्ती करावी. अशी मागणी शिक्षण घेणाऱ्या विद्याथ्र्यांच्या पालकांकडून होत आहे .

 

शाळा दुरुस्ती साठी गटशिक्षण अधिकारी पं .स. शेगांव यांचे कडे शाळा दुरुस्ती ची मागणी केलेली आहे .

– श्रीधर ढोकणे, मुख्याध्यापक जि. प . शाळा झाडेगांव