Home राज्य ‘द रिपब्लिक’ च्या ‘नाना पर्व’ चे उद्या विमोचन!

‘द रिपब्लिक’ च्या ‘नाना पर्व’ चे उद्या विमोचन!

शेगाव : माऊली ग्रुपचे सर्वेसर्वा तथा काँग्रेसचे नेते ज्ञानेश्वरदादा पाटील उपाख्य नाना यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या १२ ऑक्टोबर रोजी ‘नाना पर्व’ चे विमोचन नानांच्या हस्ते उद्या त्यांच्या निवासस्थानी करण्यात येत आहे. या विशेषांकात नाना यांच्या कार्याची माहिती आणि शुभेच्छा संदेश आहेत. त्यांचे चाहते आणि मान्यवरांच्या हस्ते या अंकांचे विमोचन केले जाणार आहे.

‘नाना पर्व’ च्या निमित्ताने…

नारळ जसे वरून कडक मात्र आतून गोड असते, तसा नाना उर्फ ज्ञानेश्वरदादा पाटील यांचा स्वभाव. कडक या शब्द शिस्तप्रिय आणि कर्तव्यनिष्ठ असा घेता येईल. एवढा प्रचंड डोलारा सांभाळून नानाच्या चेहऱ्यावर स्मित कधी हरवत नाही, असा हा गॉड गिफ्ट लाभलेला माणूस!

गेली दोन दशके नानांना जवळून पाहण्याचा योग आला, जेव्हा जेव्हा भेट झाली तेव्हा एक उपक्रमशील, विकासात्मक चर्चा आमच्यात होते. नाना यांना दूरदृष्टी आहे, त्यानुसार ते काम करत असतात, झटत असतात. ‘इवलाले रोप लावीयले दारी त्याचा वेलू गेला गगणावरी’ या उक्तीचा प्रत्यय नाना यांच्या कार्यातून होते. सर्वच क्षेत्रात ते लोकाभिमुख काम करत आहेत. केजी तो पीजी शिक्षणाची सोय त्यांनी केली आहे, त्यातही नाना सामाजिक बांधिलकी जपत असतात. आमच्या एका तरुण पत्रकाराचे अचानकपणे निधन झाले, तेव्हा त्याची मुलं माऊली स्कुल ऑफ स्कॉलर्समध्ये शिकत होती. त्यांच्या शिक्षणाचा खर्च नाना यांनी उचलला होता, असेच अनेक किस्से आहेत. गोरगरिबांच्या पाल्यांना ‘माऊली’ ग्रुप मदतीला नेहमीच तत्पर असतो. आरोग्य क्षेत्रात सुद्धा माऊली ग्रुपची भरीव कामगिरी आहे, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, डायलेसिस सेंटर अश्या अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. जळगांव जामोद मतदार संघासह आपल्या भागातील किडनी ग्रस्त रुग्णाना त्यांचा चांगला फायदा झालेला आहे. अनेक जटिल शस्त्रक्रिया आता शेगावात होतात आणखी चांगल्या आरोग्य सेवा खामगावमध्ये आणण्यासाठी नाना प्रयत्नशील आहेत. आध्यात्मिक, सामाजिक, कृषी, उद्योग क्षेत्रात सुद्धा त्यांनी मोठे कार्य उभे केले आहे.अध्यात्म हे नाना यांच्या जीवनाचे अविभाज्य अंग. आजही विद्यार्थ्यांना माऊली ग्रुप मध्ये शिक्षणा सोबतच अध्यमाताचे धडे मिळतात. हलेलं एखादे काम हाती घेतले की ते तडीस नेई प्रर्यंत नाना स्वस्थ बसत नाहीत, त्यांच्या काम करण्याची एक ऊर्जा आहे. विदर्भ पंढरी शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांचा कृपाशिर्वाद असलेल्या गणेश घराण्यात नाना यांचा जन्म झाला. ही पिढीजात पुण्याईची शिदोरी आणि वारकरी संप्रदायाच्या विचारांचं सिंचन लहानपणीच नानांवर झाले. ही ऊर्जा आणि बळाच्या जोरावर नाना अविचल सेवारत आहेत. आपल्या दूरदृष्टीवादी व कल्पक विचारांना सतत क्रियाशीलता, निस्वार्थी प्रयत्न, कर्तृत्व निष्ठेची जोड देऊन जे वैभव उभं केलं ते खरोखरच उल्लेखनीयच. तशी जन्मतःच वैभव संपन्नता घेऊन जन्माला येणारी अनेक माणसे असतात, परंतु सुसंस्कार, विचारधन घेऊन जन्माला आलेली माणसं स्वतःसाठीच नव्हे तर इतरांसाठीही जीवन जगत असतात. त्याला खर्‍या अर्थाने जगणं म्हणावं लागेलय. जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशीबही झुकावं लागतं हे नानांनी आपल्या प्रयत्नातून आज आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे. जीवन हा एक प्रवास असून इथे कायम कुणीही राहत नाही. कितीही अडचणी आल्या तरी प्रत्येकाला हा जीवन प्रवास करावाच लागतो. केवळ स्वतःचा व स्वतःच्या कुटुंबापुरता विचार न करता शेकडो कुटुंबांचा विचार करणार्‍या नानांच्या सामाजिक जीवनाचा प्रवास ज्याक्षणी समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली तेथूनच सुरू झाला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तिमिरातूनी तेजाकडे सरकणार्‍या उदयोन्मुख दिनकराच्या प्रकाशाचं तेज जसं वाढत जावं आणि त्यांच्या हातून अशीच समाजसेवा घडत राहो, हीच त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा!
श्रीधर ढगे
संपादक
द रिपब्लिक अपडेट्स

सवांद : 94 2323 7001
वेबसाईट : www.therepubluc.co.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here