Home Breaking News गुरुजी हे वागणं बरं न्हवं; प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून मुख्याध्यापकांच्या ग्रुपवर अश्लिल मॅसेज !

गुरुजी हे वागणं बरं न्हवं; प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून मुख्याध्यापकांच्या ग्रुपवर अश्लिल मॅसेज !

शेगाव : पंचायत समितीच्या मुख्याध्यापक ग्रुपवर १ ऑक्टोंबर रोजी रात्री ९.५० वाजता महिला मुख्याध्यापकांना लज्जा वाटेल असा अश्लील मेसेज प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांनी यांनी टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे.

शिक्षण विभागाचे कामकाज गतिमान व्हावे यासाठी ‘H M Group’ या नावाने व्हाट्सएप ग्रुप तयार करण्यात आला होता. या ग्रुप मध्ये शेगाव तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक समाविष्ट करण्यात आले होते. तर यामध्ये काही महिला असल्याचे समजते शासकीय कामकाजाबाबत यामध्ये नियमित माहिती देण्यात येत असे परंतू १ ऑक्टोबर रोजी रात्री ९.५० वाजता प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून अश्लील मॅसेज टाकण्यात आला त्यानंतर शिक्षण विभाग खळबळून जागा झाला व कुरमत कुरमत मोबाईल वरील स्क्रीनशॉट व्हायरल झाले त्यामुळे ग्रुप अडमिन असलेल्या एका कंत्राटी शिक्षकाने सदर ग्रुपमधून सर्वांना रिमूव्ह करत ग्रुप बंद केला. त्यानंतर काही शिक्षक व संघटनांचे प्रतिनिधीनी समोर न येता पडद्यामागची भूमिका घेत ही हकीकत पत्रकारांना सांगितली व त्याचे बिंग फुटले असून हा प्रकार शिक्षणाधिकारी यांच्या दालनात पोहचल्याची माहिती मिळाली असून याप्रकरणात पुढे काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांची पोलिसात तक्रार

शेगाव येथील प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांच्या मोबाईल वरून मुख्याध्यापकांच्या व्हाट्स आप ग्रुपवर अश्लील मॅसेज गेल्याने गटशिक्षणाधिकाऱ्यांनी खामगाव पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून १ ऑक्टोबर रोजी रात्री ९ ते ११ दरम्यान मोबाईल चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

माझ्याकडून कुठल्याही प्रकारचा अश्लील मेसेज टाकण्यात आलेला नाही परंतु खामगाव बसस्थानक परिसरात माझा मोबाईल चोरीला गेला त्याच दिवशी हा प्रकार घडला आहे मोबाईलचा कुणीतरी गैरवापर केला आहे व मोबाईल चोरीला गेल्याची रितसर तक्रार पोलिसात देण्यात आली आहे

– प्रभारी गटशिक्षणाधिकारी, शेगाव