Home जागर अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांचे नागरिकांना आवाहन! पहा व्हिडिओ!

अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांचे नागरिकांना आवाहन! पहा व्हिडिओ!

 

खामगाव : 8 ते 14 ऑक्टोबर विशेष कोविड-19 लसीकरण मोहीम “मिशन कवच कुंडल” आज पासून सुरू होत आहे त्यानिमित्ताने आज सामान्य रुग्णालय खामगाव येथे लसीकरण वाहनाचा हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी हिरवी झेंडी दाखवून सदर लसीकरण वाहनाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी उपविभागीय महसूल अधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार खामगाव अतुल पाटोळे, वैद्यकीय अधीक्षक सामान्य रुग्णालय खामगाव डॉ निलेश टापरे,शहर पोलीस स्टेशन ठाणेदार प्रदीप त्रिभुवन,तालुका आरोग्य अधिकारी डॉ अभिलाष खंडारे,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप सोनटक्के, वैद्यकीय अधिकारी डॉ मोहसीन शेख, रुग्णालयातील अधिकारी-कर्मचारी-परिचारिका यावेळी उपस्थित होते सदर लसीकरण वाहन शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन नागरिकांचे लसीकरण करणार येणार आहे आपल्या भागामध्ये सदर लसीकरण वाहनांची नोंदणी व शिबीर आयोजनासाठी स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी, दुर्गा मंडळ यांनी वैद्यकीय अधीक्षक सामान्य रुग्णालय खामगाव डॉ निलेश टापरे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे

पहा व्हिडिओ