अनेकांना लागली लत ; संसार उघड्यावर येण्याची भीती
माटरगाव :- जलंब पोलीस स्टेशन अंर्तगत येत असलेले माटरगाव गावात गेल्या सहा तीन महिन्यापासून सऱ्हास अवैध चक्री व्यवसाय सुरू आहे
या छोट्याशा गावात तीन ते चार दुकाने अवैध रित्या सुरू असून गावातील लोकांची सऱ्हास लूट होत असल्याचे बोलल्या जात आहे. गावातील लोकांचे या चक्री दुकानावर भांडणे सुद्धा होत असून लोकांनी आपल्या घरातील वस्तू विकून चक्री खेळण्याचा नाद लागला आहे परंतु चक्री व्यवसायाला परमिशन का मिळत आहे हे मात्र एक कोड आहे
मिळालेल्या माहिती वरून एका चक्री दुकान दारकडून अवैध चक्री सुरू करण्यासाठी 70ते 80 हजार रुपये हप्ता पोलीस स्टेशनला मिळतो मग काय अवैध चक्री बंद होणार छोट्याश्या माटरगाव मधून लाखो रुपयांचे जलंब पोलीस स्टेशनला इन्कम मिळत आहे त्यामुळे त्यांची या व्यवसायिकांकडे डोळेझाक होत आहे. लोकांना पीक पाणी नाही दुष्काळ परिस्थिती असून अवैध व्यवसायातून नागरिकांची लूट होत असल्याचे चित्र या माटरगावात दिसून येते. काही दिवसा आधी याच चक्रीवर एक व्यक्ती 40 हजार रुपये हरल्याने आत्महत्या करण्याचा मार्ग अवलंबने होते परंतु गावातील समजदार नागरिकांची पैसे परत देण्याचे सांगितले व काही दिवस गावातील चक्री बंद करण्यात आले होते परंतु यांनी पुन्हा जलंब पोलीस स्टेशन गाठून परमिशन मागितली व आपले दुकान सुरू करून पुन्हा जनतेची लूट सुरू केली आहे याकडे पोलीस प्रशासनाने डोळे बंद ची भूमिका घेतली आहे परंतु वरिष्ठ अधिकारी यांनी या कडे लक्ष देणे गरजेचे आहे. नवीन श्रवण दत्त रुजू झाले असल्यामुळे अवैध धंदे वाल्यांचे धाबे दणाणले असून माटरगाव येथेसुद्धा पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे.