Home Breaking News अनैतिक संबंधातून महिलेचा खून ; पुलाखाली सापडला मृतदेह

अनैतिक संबंधातून महिलेचा खून ; पुलाखाली सापडला मृतदेह

बारा तासातच पोलिसांनी लावला आरोपीचा शोध 

जळगांव :बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील गाडेगाव खुर्द ते खांडवी रस्त्यावर एका खाजगी शाळा नजीक पुलाखाली अज्ञात महिलेची मृतदेह सापडल्याने जळगाव तालुक्यात एकच खळबळ माजली होती.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक पोलिस निरीक्षक सुनील आंबुलकर ह्यांनी बारा तासाच्या आत मृतक महिलांची ओळख पटून आरोपीचा शोध लावण्यास यश मिळवले.

जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम गाडेगाव खुर्द येथील पोलीस पाटील राहुल नामदेव निंबाळकर वय 55 वर्ष यांनी दिनांक ७ ऑक्टोबर रोजी स्थानिक ठाण्यात फोन करून माहिती दिली की भास्करराव शिंगणे शाळे जवळील गाडेगाव खुर्द ते खांडवी स्थित एका पुलाच्या खाली कोण्या तरी अज्ञात महिलेचा मृतदेह एका बोरी मध्ये भरलेला दिसत असून त्याचा पाय बाहेर आलेला आहे. अश्या प्रकारची तक्रार त्यांनी दिली .
या आधारे पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध ३०२,२०१ भादवी नुसार गुन्हा दाखल केल्यावर ठाणेदार यांनी ताबडतोब पीएसआय सचिन वाकडे व त्यांचे सहकारी यांची एक टीम तयार करून घटनास्थळी दाखल केली.
पोतदी मध्ये यामध्ये भरलेला अज्ञात महिलेचा शव बाहेर काढला आणि त्याची ओळख पटवण्यासाठी धावपळ सुरू केली या धावपळीमध्ये ठाणेदारांना माहिती मिळाली की संजय पारस्कर राहणार टाकळी पारसकर यांच्या शेतामध्ये मागील चार दिवसापासून तीन-चार जनावर उपाशीपोटी बांधलेले आहेत.आणि त्या ठिकाणी कोणीच नाही या माहितीच्या आधारे ठाणेदार यांनी सदर शेतामध्ये जाऊन चौकशी केली असता संजय पारस्कर यांनी सांगितले की चार-पाच दिवस अगोदर त्यांनी शेतामध्ये काम करण्यासाठी नंदू उर्फ कैलास जवंजाळ राहणार हिवरा तालुका मुक्ताईनगर या व्यक्तीला एका महिलेसोबत कामावर ठेवले होते.
परंतु मागील तीन-चार दिवसांपासून तो व्यक्ती आणि सदर महिला कामावर आलेच नाही अशी माहिती त्यांनी दिली.
सदर व्यक्तीचे सामानाची झडती घेतली असता मृतक महिलाची माहिती त्या ठिकाणी भेटली मृतक महिला पिंकी उर्फ सुरेखा निटवणे राहणार हिवरा तालुका मुक्ताईनगर या महिलेचा माहेर जळगाव तालुक्यातील झाडेगाव येथील असून मृतक महिलेचा लगन पंधरा वर्षे अगोदर हिवरा येथे झाले होते.
परंतु सात-आठ वर्षे अगोदर मृतक महिलेच्या पतीच्या निधन झाल्याने सदर महिला संशयित आरोपी नंदू उर्फ कैलास जवंजाळ याच्या संपर्कात होती मागील पाच सहा महिन्यापासून मृतक सुरेखा व कैलास जवंजाळ हे दोघी लासलगाव येथे राहत होते .
व नंतर पाच-सहा दिवस आगोदर टाकळी पारसकर येथे संजय पारस्कर यांच्या शेतात मुक्कामी कामासाठी गेले होते.
नंतर सुरेखा मृतावस्थेत गाडेगाव खुर्द ते खांडवी रस्त्यावर एका पुलाखाली पोत्यात भरलेली सापडली व त्याच्या सोबत राहणारा व्यक्ती म्हणजेच कैलास फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.
सदर प्रकरणाची चोकशी DYSP अभिनव त्यागी यांच्या मार्गदर्शन मध्ये सुनील अंबुलकर यांच्या आदेशाने psi सचिन वाकडे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुशिर ,सचिन राजपूत व त्यांचे सहकारी करीत आहे.

गाडेगाव ते खांडवे रस्त्यावर सापडलेल्या महिलेचा शवचा अंतीमसंस्कार करण्या साठी मूर्त महिलेच्या माहेर कळच्या लोकांनी नकार दिल्या नंतर ठाणेदार यांनी स्वतः त्या महिलेचा पंचा समक्ष स्थानिक हिंदू समशानभुमी मध्ये अंतीमसंस्कार केला.