Home Breaking News रेतीने भरलेले ट्रॅक्टर पंचनामा करून नायब तहसीलदार यांनी परस्पर सोडले!

रेतीने भरलेले ट्रॅक्टर पंचनामा करून नायब तहसीलदार यांनी परस्पर सोडले!

संग्रामपूर :तालुक्यातील करमोळा येथील महादेव नदी पात्रात दिनांक 8ऑक्टोंबर रोजी संग्रामपूर तहसील चे नायब तहसीलदार प्रवीण वराळे यांनी आयशर कंपनी चे ट्रॅक्टर सकाळी साडेदहा वाजता पकडले, सदर ट्रॅक्टर चा पंचनामा ही केला. मात्र घटनास्थळी ट्रॅक्टर मालक आल्याने व ट्रॅक्टर मालक व नायब तहसीलदार याच्यात अर्धा तास नदीपात्रात आर्थिक देवाण-घेवाण करून ट्रॅक्टर परस्पर सोडून देण्याचे ठरल्याने नायब तहसीलदार वराडे यांनी ट्रॅक्टर परस्पर नदीपात्रातून सोडून दिले याबाबत प्रस्तुत प्रतिनिधी यांनी नायब तहसीलदार वराडे यांना याबाबत विचारणा केली असता नायब तहसीलदार यांनी सदरचे ट्रॅक्टर पकडले व पंचनामा केला मात्र ट्रॅक्टर चालक ्रॅक्‍टर घेऊन पसार झाल्याची कबुली नायब तहसीलदार वराडे यांनी बोलताना दिली मात्र रात्री आठ वाजेपर्यंत ही सदर ट्रॅक्टरवर कुठलीही कारवाई न झाल्यामुळे या कारवाईचे पाणी नेमके कुठे मुरले याबाबत संग्रामपूर तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे

8ऑक्टोंबर रोजी करमोळा येथील नदी पात्रात रेतीचा ऊपसा सुरू असल्याची माहिती नायब तहसीलदार वराडे यांना मिळाली मिळालेल्या माहितीवरून करमोळा येथील नदीपात्रात नायब तहसीलदार वराडे व त्यांचे सहकारी मंडळ अधिकारी चामलाटे तलाठी डाबरे यांना सोबत घेऊन करमोळा येथील नदीपात्रात सकाळी साडेदहा वाजता गेले व त्यानी नदीपात्रात ट्रॅक्टर मालकाचे ट्रॅक्टर पकडले व सदर ट्रॅक्टरचा रेतीचा पंचनामा ही केला मात्र ट्रॅक्टर मालक घटनास्थळावर हजर झाल्याने नायब तहसीलदार व ट्रॅक्टर मालकांमध्ये आर्थिक देवाण-घेवाण करून सेटलमेंट करून घेवू असे ठरल्याने सदरचे ट्रॅक्टर नायब तहसीलदार वराडे यांनी परस्पर सोडून दिले त्यानंतर सदर ट्रॅक्टर मालकाचा भाऊ हा दिवसभर संग्रामपूर तहसील कार्यालयात नायब तहसीलदार वराडे यांच्यासोबत होता हे विशेष या कारवाईमध्ये नायब तहसीलदार यांच्या सोबत असलेले एका मंडळ अधिकाऱ्यांने सर्व आप बीती आमच्या प्रस्तुत प्रतिनिधीला मोबाईल द्वारे सांगितली नायब तहसीलदार वराडे यांच्या सोबत असलेला एका मंडळ अधिकाऱ्याने या कारवाईची माहिती सांगताना सांगितले की हो आम्ही आज ट्रॅक्टर पकडले मात्र सदरची ट्रॅक्टर ट्रॅक्टर चालक घेऊन गेला स्वतः ट्रॅक्टर मालकाने पंचनावर स्वाक्षऱ्या केल्या व नायब तहसीलदार वराडे यांनी सदरचा पंचनामा तहसील कार्यालयात घेऊन गेले अशा प्रकारची माहिती संबंधित मंडळ अधिकार्याने प्रस्तुत प्रतिनिधीशी मोबाईलवर बोलताना दिली मात्र संग्रामपूर तहसील चे नायब तहसीलदार प्रविण वराडे यांनी रात्री आठ वाजेपर्यंत ही सदर ट्रॅक्टर वर कुठलीही कारवाई केली नाही त्यामुळे सदर ट्रॅक्टर चालकावर जिल्हाधिकारी यांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी संग्रामपूर तालुक्यातील नागरिकांमधून होत आहे.