Home खामगाव तालुका आमदार ॲड आकाश फुंडकर यांच्या सुचनेनुसार विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बससेवा सुरु

आमदार ॲड आकाश फुंडकर यांच्या सुचनेनुसार विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बससेवा सुरु

 

@ विद्यार्थ्याच्या समस्या सोडविण्यासाठी कटीबध्द- आ ॲड आकाश फुंडकर
@ बौथा, नांद्री, मांडणी व श्रीधर नगरच्या विद्यार्थ्यांना लाभ
खामगांव  : मतदार संघातील स्वातंत्र काळापासून प्रलंबीत असलेला श्रीधर नगर हा रस्ता खामगांव विद्यानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी मंजूर करुन पुर्ण करुन घेतला. या गावातील असंख्य विदयार्थी खामगांव येथे शिक्षणासाठी येत असतात. परंतु या विद्यार्थ्यांना खामगांव येण्याजाण्यासाठी बससेवा सुरु नव्हती. त्यामुळे आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना सुचना देऊन तात्काळ बससेवा सुरु करण्यास सांगितले.
त्यानुसार दि.05 ऑक्टोबर 2021 रोजी पंचायत समिती सदस्य हर सिंग साबळे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून ही बससेवा सुरु करण्यात आली यावेळी सदपंच नांद्री गट ग्रामपंचायत श्री अंबादास वानखेडे, माजी सरपंच सोनाभाऊ कोळपे यांचेसह बोथा नांद्री मांडणी श्रीधर नगर येथील गावकरी व गुलावबाबा विद्यालय वर्णा येथील शिक्षक व कर्मचारी वृंद उपस्थित होते.


ही बस सुरु झाल्यामुळे उपरोक्त गावातील विद्यार्थ्यांना वर्णा व खामगांव येथे शिक्षणासाठी येणे सोईचे झाले असून गावकरी व विद्यार्थ्यांच्या पालकांकडून आमदार ॲड आकाश फुंडकर यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here