Home Breaking News खामगावच्या ऑक्सीजन प्लॅन्टचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते थाटात उदघाटन

खामगावच्या ऑक्सीजन प्लॅन्टचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते थाटात उदघाटन

कोरोना लाटेचा विचार करुन खामगांवकरांसाठी जिल्हयातील पहिला ऑक्सीजन प्लँट कार्यान्वीत- आमदार ॲड आकाश फुंडकर
खामगाव : आज दि.07 ऑक्टोंबर 2021 रोजी खामगांव सामान्य रुग्णालय येथे घटस्थापनेचे औचित्य साधत देशाचे पंतप्रधान मा. श्री नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते ऑक्सीजन प्लाँटचे व्हर्चुअल उदघाटन करण्यात आले. यावेळी खामगांव विधानसभा मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार ॲड आकाश फुंडकर हे देखील उपस्थीत होते.
आज मा पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन उदघाटन करण्यात आलेल्या ऑक्सीजन प्लँटचे कक्षांचे आमदार ॲड आकाश फुंडकर यांच्या हस्ते फित कापून लोकार्पण करण्यात आले. या उद़घाटन प्रसंगी अति जिल्हाधिकारी श्री गोगटे, तहसिलदार पाटोळे, बीडीओ राजपूत, वैद्यकीय अधिक्षक निलेश टापरे, नगराध्यक्ष अनिता डवरे, उद्योजक विपीनसेठ गांधी, रुग्ण कल्याण समिती सदस्य़ राम मिश्रा यांचेसह डॉक्टरर्स व इतर वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.
कोरोना महामारी काळात जिल्हयाभरातील कोरोना रुग्ण खामगांव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची उत्कृष्टी सेवा उपचार खामगांव सामान्य रुग्णालय खामगांव येथे करण्यात आले. संपुर्ण कोरोना महामारी काळात खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर हे सर्व परिस्थितीवर लक्ष ठेऊन होते. कोरोना रुग्णांची आवश्यकता लक्षात घेता खामगांव येथे अतिरिक्त बेडचे नवीन स्वतंत्र कोव्हीड कक्ष स्थापन करण्यात आले.


संपुर्ण महाराष्ट्रात पहिलाच लोकसहभागातून कोव्हीड स्वॅब टेस्ट लॅब सुरु करण्यात आला. आमदार ॲड आकाश फुंडकर यांच्या मार्गदर्शनात सामान्य रुग्णालय खामगांव व्दारा संपुर्ण जिल्हयातील कोरोना रुग्णांसाठी चांगली आरोग्य़ सेवा प्रदान केली. अनेक रुग्णांचे जीव वाचविले. त्यामुळे बुलढाणा जिल्हयातून खामगांव सामान्य रुग्णालय येथे ऑक्सीजन प्लाँट लावण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला. खामगांव सामान्य रुग्णालय येथे सर्व सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे कोरोना महामारीची तिसरी लाट आल्यास खामगांवकर तसेच जिल्हाभरातील रुग्णांना सोईचे व्हावे यासाठी पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्रालय व्दारा वैद्यकीय श्रेणीचा हा ऑक्सीजन प्लाँट खामगांव येथे उभारण्यात आला आहे.
या उद़घाटन प्रसंगी अति जिल्हाधिकारी श्री गोगटे, तहसिलदार पाटोळे, बीडीओ राजपूत, वैद्यकीय अधिक्षक निलेश टापरे, नगराध्यक्ष अनिता डवरे, उद्योजक विपीनसेठ गांधी, रुग्ण कल्याण समिती सदस्य़ राम मिश्रा यांचेसह डॉक्टरर्स व इतर वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.