Home शेगाव विशेष हजारो भाविकांनी घेतले पहिल्या दिवशी श्रींचेदर्शन

हजारो भाविकांनी घेतले पहिल्या दिवशी श्रींचेदर्शन

भक्तांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता आनंद
शेगाव: मागील जवळपास दोन वर्षापासून भक्तांसाठी दर्शनाकरिता बंद असलेले शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांचे मंदिर आज 7 ऑक्टोंबर रोजी राज्य शासनाच्या आदेशानुसार फक्तं दर्शनासाठी खुले करण्यात आले.

आज घटस्थापना आणि गुरुवार असा दुहेरी योग त्यातच दर्शनासाठी भाविकांना करिता मंदिर उघडले याचा आनंद भक्तांना गगनात मावेना पहिल्या दिवशी जवळपास नऊ हजार भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले मागील दोन वर्षापासून मध्यंतरी काही काळ वगळता श्रींचे मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले होते मात्र बंद काळामध्ये भाविक श्रींचे दर्शन मंदिराच्या प्रवेश द्वारावरच नतमस्तक होऊन दर्शन घेत होते.

अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व नियमांचे काटेकोरपणे पालन करीत भाविक भक्त मोठ्या श्रध्देने श्रींचे दर्शन घेतांना दिसत होते. पहाटे पाच वाजता पासून एईपस द्वारे दिलेल्या वेळेनुसार भाविकांनी मंदिराच्या प्रवेशद्वारावर आपली पाच घेऊन रांगेत आपले नंबर येण्याची वाट बघत असताना दिसत होते हे मंदिर उघडल्यामुळे भाविकांना सोबतच परिसरातील दुकानदारही सुखावले आहेत.