Home Breaking News शेगावातील युवकांची राष्ट्रीय स्तरावर भरारी

शेगावातील युवकांची राष्ट्रीय स्तरावर भरारी

शेगाव(प्रतिनिधी) । शहरातील युवकांनी अ‍ॅथेलिटीक्स मध्ये राष्ट्रीय स्तरावर भरारी घेतली असून नॅशनल स्पोर्टस अ‍ॅन्ड फिजिकल फिटनेस बोर्डाकडून घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये तीसरे स्थान पटकावले आहे.
उमेश विष्णू सहारे वय 23 रा.पंचशिलनगर शेगाव ह्या युवकाने नॅशनल स्पोर्टस अ‍ॅन्ड फिजिकल फिटनेस बोर्डाकडून 1 ऑक्टोबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान डेहराडून येथे घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये 100 मिटर धावण्याच्या शर्यतीत पहिला क्रमांक पटकावला. त्याने राज्यस्तरावर अव्वल येण्याचा बहुमान मिळविला होता.
त्याचप्रमाणे आदित्य नाजूकराव इंगळे 19, रा.निर्मलनगर शेगाव ह्याने सुध्दा डेहराडून येथील स्पर्धेत सहभागी होवून 800 मिटर धावण्याच्या शर्यतीत पहिले स्थान मिळवून सुवर्णपदक प्राप्त केले आहे. याने सुध्दा राज्यस्तरावर अव्वल येण्याचा बहुमान मिळविला होता.

विजयाचा आनंदोत्सव

उमेश सहारे व आदित्य इंगळे यांनी मिळविलेल्या विजयाचा आंनदोत्सव त्यांच्या मित्रमंडळींकडून मोटारसायकल रॅली काढून साजरा करण्यात आला. रॅली दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना विजेत्यांच्या हस्ते हारार्पण करून अभिवादन करण्यात आले.