अकोला जिल्हा परिषदेचा निवडणूक निकाल आज जाहीर झाला असून त्यात वंचित बहुजन आघाडीची सरशी ठरली तर प्रहार ने सुद्धा खाते उघडलं आहे.
अकोला जिल्हा परिषदेच्या १४ जागांचे निकाल आज घोषित झाले आहेत. त्यात वंचित बहुजन आघाडीला ६ जागी यश आले. तर
अपक्ष २ शिवसेना १, प्रहार १, राष्ट्रवादी ३,भाजप १ आणी काँग्रेसला१ जागा मिळाली. अकोला हा वंचित आघाडीचा गड मनाला जातो. सर्वाधीक जागा घेत वंचितने पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे.
असे आहेत विजयी उमेदवार
1) अकोलखेड : जगन्नाथ निचळ,शिवसेना
2) घुसर : शंकरराव इंगळे, वंचित
3) लाखपुरी : सम्राट डोंगरदिवे, अपक्ष
4) अंदूरा : मीना बावणे, वंचित
5) दगडपारवा : सुमन गावंडे,राष्ट्रवादी
6) अडगाव : प्रमोदीनी कोल्हे, अपक्ष
7) कुरणखेड : सुशांत बोर्डे, वंचित
8) बपोरी : मायाताई कावरे, भाजप
9) शिर्ला : सुनील फाटकर, वंचित
10) देगाव : राम गव्हाणकर, वंचित
11)कानशिवनी: किरणताई आवताडे, राष्ट्रवादी
12)कुटासा : स्फुर्ती गांवडे, प्रहार
13) तळेगाव : संगीताताई अढाऊ, वंचित
14) दानापूर : गजानन काकड, काँग्रेस
एकूण जागा : 14
निकाल जाहीर : 14