Home Breaking News कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ खामगावात कॉंग्रेसची निदर्षने

कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ खामगावात कॉंग्रेसची निदर्षने

 

खामगांव:- उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी या गावात तीन काळया कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांवर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्र यांच्या मुलाने गाडी घालून चार शेतकऱ्यांची हत्या केली. कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी मृतक शेतकरी कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी लखीमपूर येथे जात असतांना 4 ऑक्टोंबर 2021 रोजी उत्तर प्रदेश पोलीसांनी अटक केली.प्रियंका गांधी यांना बेकायदेशीररित्या केलेल्या अटकेच्या निषेधार्थ खामगांव शहर व तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने खामगांव येथील गांधी चौक परिसरात उत्तर प्रदेशमधील योगी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.सदानंद धनोकार,महिला शहर कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ.सुरजितकौर सलुजा,तालुकाध्यक्षा सौ.भारतीताई पाटील, माजी नगराध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने, महिला संघटक शरदाताई शर्मा,नगरसेवक किशोरआप्पा भोसले,बाजार समितीचे माजी मुख्य प्रशासक पंजाबराव देशमुख, पं.स.सदस्य मनिष देशमुख,माजी जि.प.सदस्य सुरेशसिंह तोमर आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बाजार समितीचे माजी मुख्य प्रशासक पंजाबरावदादा देशमुख यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, भारत हा कष्शी प्रधान देश असून शेतकरी विरोधी तीन काळे कृषी कायदे रदद् करावे या मागणीसाठी अनेक महिन्यांपासून देशभरातील शेतकरी आंदोलन करीत आहे. भाजपा सरकार आंदोलक शेतकऱ्यांच्या जीवावर उठले आहे. उत्तर प्रदेशमध्ये घडलेली घटना ही निंदनीय असून यामुळे शेतकरी नरसंहार करणाऱ्या भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे. कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी हे मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी जात असतांना हिटलरशाही ही प्रवृत्तीच्या योगी सरकारने त्यांना अटक केली. या घटनेचा खामगांव मतदार संघातील कॉंग्रेसजणांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.
यावेळी वाडीचे सरपंच विनोद मिरगे,सुटाळा खु.चे सरपंच निलेष देषमुख, पंकज गिरी,तानाजी नाईक,निखील देशमुख ,माणिकराव देशमुख, कृष्णा नाटेकर, एनएसयुआयचे शहर अध्यक्ष रोहित राजपुत, कॉंग्रेस सोशल मिडीयाचे अध्यक्ष आकाष जैस्वाल, प्रमोद महाजन, माजी नगरसेवक परवेजखान पठान, प्रितम माळवंदे, जसवंतसिंग शीख,पिंटु जाधव,उत्तम माने, हाफीज साहेब, सागर मुयांडेपाटील, अनंता माळी, अमित भाकरे, रवि भोवरे, गजानन सोनोने, राजेश जोशी,अशोकबाप्पु देशमुख, गुडडु मिरचीवाला, माजी नगरसेवक मो.नईम, अस्लम पटेल, शाम मोरे, मनोज वानखडे, पंकज पुरी, केशव कापले, राम भिते,आबीद उलहक,सुभान मिस्तरी यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.