Home Breaking News खामगावच्या रहदारीचा मुद्दा मंत्र्यांच्या दालनात ; धनंजयदादा यांचा पाठपुरावा!

खामगावच्या रहदारीचा मुद्दा मंत्र्यांच्या दालनात ; धनंजयदादा यांचा पाठपुरावा!

शहराच्या रहदारीचा प्रश्न लवकरच सुटणार
मंत्री सतेज पाटील धनंजय देशमुख यांची चर्चा

खामगाव : शहरातील रहदारी संदर्भात मंत्री सतेज पाटील यांच्याशी धनंजय देशमुख यांनी केली चर्चा
याप्रसंगी देशमुख यांनी सांगितले की खामगाव शहरा ची वाढती लोकसंख्या याचा विचार करून तसेच वाढती रहदारी याचा विचार करून रहदारी च्या अडचणीमुळे नेहमी होणाऱ्या दुर्घटनाचा गांभीर्याने विचार करून खामगाव शहरातील प्रमुख चौकात चौकामध्ये सिग्नल हे सुरु करावेत तर काही भागांमध्ये पार्किंगसाठी नागरिकांना होणारा त्रास फार मोठ्या प्रमाणावर असल्याने त्या अरुंद रस्त्या ना वनवे करणे गरजेचे असून रस्त्यांवरील पार्किंग रहदारीचा प्रश्न सोडवणे ही खूपच गरजे चा आहे तर गुरुवारी मोठ्या प्रमाणावर भरणाऱ्या आठवडी बाजारामुळे कमालीची रहदारीला अडचण निर्माण होत असते खामगाव शहर हेबुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर असून सर्वात मोठी बाजारपेठ असलेल शहर आहे.

या शहरांमध्ये अनेक ठिकाणी रहदारीच्या खूपच समस्या आहे त्याआपण पुढाकार घेऊन सोडवाव्यात अशी विनंती काँग्रेस प्रदेश सचिव धनंजय देशमुख यांनी मंत्री सतेज पाटील यांना केली यावर ताबडतोब मंत्री सतेज पाटील यांनी देशमुखांनी मांडलेल्या समस्यांची त्वरित दखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक यांना शहराच्या सुरळीत योग्य रहदारीच्या संदर्भात त्वरित कारवाई करून शहराच्या रहदारीचा प्रश्न सोडवावा तसेच केलेल्या कारवाई त्वरित मलाकळवावी असे आदेश दिले आहे याप्रसंगी धनंजय देशमुख यांनी मंत्री सतेज पाटील यांचे आभार मानले.