Home खामगाव विशेष खामगाव मतदारसंघातील ग्रामपंचायतींनी विशेष बाब अंतर्गत विकास कामाचे प्रस्ताव सादर करावे :ज्ञानेश्वरदादा...

खामगाव मतदारसंघातील ग्रामपंचायतींनी विशेष बाब अंतर्गत विकास कामाचे प्रस्ताव सादर करावे :ज्ञानेश्वरदादा पाटील

 

खामगाव – खामगाव मतदारसंघातील ग्रामपंचायतींनी विशेष बाब अंतर्गत विकास कामाचे प्रस्ताव सादर करावे, सदर प्रस्ताव जिल्हा नियोजन समितिच्या बैठकीत ठेवून त्यास मंजुरात दिली जाईल तर त्वरित प्रस्ताव द्यावेत असे आवाहन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ,खामगाव मतदार संघ काँग्रेस पक्ष नेते ज्ञानेश्वरदादा पाटील यांनी केले आहे.

बुलडाणा जिल्हा नियोजन समितीची सभा ९ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता बुलडाणा येथील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री, जिल्हाचे पालकमंत्री तसेच जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष नामदार डॉ . राजेंद्र शिंगणे राहणार आहेत. तसेच सर्व प्रशासकीय अधिकारी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उपस्थित राहतील.

जिल्हा हा नियोजनाचा पायाभूत घटक मानून जिल्ह्याकरिता यथार्थदर्शी वार्षिक योजना तयार करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चर्चा होईल तसेच विकास कामाचे प्रस्ताव मंजूर केले जाणार आहेत. तरी खामगाव मतदार संघातील सर्व ग्रामपंचायत सरपंच – सचिव यांनी पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या नावाने विनंती अर्ज जोडून विशेष बाब अंतर्गत विकास कामाचे प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ,खामगाव मतदार संघ काँग्रेस पक्ष नेते ज्ञानेश्वरदादा पाटील यांनी केले आहे.